'या' शिक्षिकेचं आनंद महिन्द्रा आणि किंग खानकडून कौतुक

आपला हातच कॅलक्युलेटर 

Updated: Jan 24, 2020, 03:57 PM IST
'या' शिक्षिकेचं आनंद महिन्द्रा आणि किंग खानकडून कौतुक

मुंबई : असंख्य संख्यांच गणित अगदी होताच्या बोटांवर मोजण्याची कला एका शिक्षिकेने दाखवली. शिक्षिकी रूबी कुमारी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरात व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून गणित सोडवण्याचा अनोखा फंडा समोर आला आहे. 

सात जानेवारी रोजी बिहार शिक्षा परियोजन परिषदच्या टीचर्स ऑफ बिहार नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. याची लिंक ट्विटरवर टाकून शिक्षिका रूबी यांची शिकवण्याची अनोखी पद्धत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. या व्हिडिओला आतापर्यंत 45 हजारहून अधिक लोकांनी शेअर केलं असून तीन लाखहून अधिक लोकांकडे हा व्हिडिओ पोहोचला आहे. 

या व्हिडिओला अभिनेता शाहरूख खान आणि महिन्द्रा ग्रुपचे मालक आनंद महिंद्रा यांनी रिट्वीट केलं आहे. आतापर्यंत 1 लाख 83 हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 

टीचर्स ऑफ बिहारचे शिवकुमार यांनी सांगितलं की,'रूबी कुमारी शिक्षिका खूप चांगल काम करत आहेत. प्रत्येक दिवशी त्या काहीना काही नवीन काम करत असतात.' हाताच्या 10 बोटांच्या मदतीने आपण मोठ्यातील मोठं गणित अगदी सहज सोडवू शकतो.