शाहरूख खानच्या मुलीचा ग्लॅमरस लूक व्हायरल

फोटो व्हायरल

शाहरूख खानच्या मुलीचा ग्लॅमरस लूक व्हायरल  title=

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानची मुलगी सुहाना खानचं देखील नाव स्टार किड्समध्ये सहभागी आहे. सुहाना कायमच आपल्या फोटोंमुळे चर्चेत असते. सुहानाचं अनेकदा तिच्या लूक, स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळे कौतुक झालं आहे. सुहाना जेव्हापण इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर करते तेव्हा तिचा फोटो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होतो. सुहानाची स्टाइल स्टेटमेंट आणि फॅशन सेन्स खूप छान असल्यामुळे ती कायमच चर्चेत राहिली आहे. 

सुहानाचा आताचा फोटो पाहाल तर तुम्ही देखील चकीत व्हाल. ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. सुहानाने रेड प्लाजो आणि क्रॉप टॉप घातला आहे. सोबतच स्नीकर्स आणि सनग्लासेस घातले आहे. 

 

Te Amo bebe 

A post shared by suhana khan (@suhanakha2) on

सुहाना लवकरच वॉग मॅगझीनच्या कव्हर पेजवर दिसणार आहे. सुहानाला अभिनयात रूची असून दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमातून ती आपल्या करिअरला सुरूवात करणार आहे. अनेक स्टार किड्सना करण जोहरने संधी दिली आहे. सुहाना 2020 पर्यंत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. याबाबत शाहरूख खानने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, सुहानाने सर्वात अगोदर आपलं शिक्षण पूर्ण करावं त्यानंतर ती फील्डवर येऊ शकते.