सोनू सूदकडून प्रेरणा घेत हा अभिनेता मदतीसाठी पोहोचला रेड लाईट एरियात

भारतात कोरोनामुळे सर्वत्र महामारी पसरली आहे. 

Updated: Jun 23, 2021, 03:12 PM IST
सोनू सूदकडून प्रेरणा घेत हा अभिनेता मदतीसाठी  पोहोचला रेड लाईट एरियात

मुंबई : भारतात कोरोनामुळे सर्वत्र महामारी पसरली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाायात मोठा तोटा सहन करावा लागला. कोरोना काळात उपासमारीची वेळ कमाठीपुरातल्या देहविक्री करणाऱ्या महिलांवर देखील आली. त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. त्यांच संकट काही प्रमाणात कमी करण्यासाठी अभिनेता शालिन भनोट त्यांच्या मदतीला धावून गेला. शिवाय त्याने सेक्स वर्कर्ससोबत गप्पा देखील केल्या आणि आलेला अनुभव देखील शेअर केला. 

नागिन 4 मालिकेत दुर्योधन ही भूमिका बजावणाऱ्या शालिनने सेक्स वर्कर्सची मदत करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शालिनच्या या पुढाकारामुळे सोशल मीडियावर त्याचं कौतुक होत आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शन देखील दिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तो म्हणाला 'सोनू सूदकडून मला प्रेरणा मिळाली आणि मी मदतीसाठी पुढे आलो. कमाठीपुराच्या छोट्या गल्ल्यांमधून जाताना मला वेगळा अनुभव आला. दुसऱ्या लॉकडाऊन दरम्यान सुद्धा मला अस्वस्थ वाटतं होतं. जेव्हा मी सामाजीक कार्यकर्त्याला भेटलो तेव्हा ते मला म्हणाले फक्त 50 रूपयांमध्ये या महिला देह व्यापार करतात. '

कमाठीपुरामध्ये जवळपास 1 हजार 300 कुटुंब राहतात. त्यापैकी 100 पेक्षा जास्त कुटुंबाला शालिने मदत केली. त्याने महिलांना धान्य, मास्क आणि इतर आवश्यक सामाण दिलं. तेथील महिलांनी देखील शालिनसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.