close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शमा सिकंदरने आपल्या प्रायव्हेट पार्ट संदर्भात केलं मोठं वक्तव्य

बॉलिवूडमधील हॉट आणि सेक्सी अभिनेत्री असलेल्या शमा सिकंदरने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या बिकनी फोटोजमुळे चर्चेत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 11, 2018, 03:26 PM IST
शमा सिकंदरने आपल्या प्रायव्हेट पार्ट संदर्भात केलं मोठं वक्तव्य

मुंबई : बॉलिवूडमधील हॉट आणि सेक्सी अभिनेत्री असलेल्या शमा सिकंदरने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या बिकनी फोटोजमुळे चर्चेत आहे. त्याच दरम्यान, शमाने पुन्हा एकदा आपल्या बिकनीमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

 

A sass a day keeps the basics away #ManlyBeach #Sydney #TravelDiaries

A post shared by Shama Sikander (@shamasikander) on

शमा सिकंदरने शेअर केलेल्या फोटोतील कॅप्शनमध्ये असं काही लिहीलं आहे जे सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

शमा सिकंदरने महिलांच्या शरीराच्या रचनेचं कौतुक करत महिलांसंदर्भात आपले विचार मोकळेपणाने मांडले आहेत.

अभिनेत्री शमाने आपल्या बिकनी फोटोवर लिहीलं आहे की, महिलांकडे स्तन असतात आणि हा महिला-पुरुषांमधील एक फरक आहे. माझ्याकडे स्तन आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे. ज्यांनी मला ट्रोल केलं आहे आणि मला नावं ठेवली आहेत त्यांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. मी माझ्या शरीरावर खूप प्रेम करते.

शमा सिकंदरने पुढं हॅशटॅग करत म्हटलं आहे की, महिलांचा सन्मान करा.

२००३ साली सोनी टीव्हीवरील आलेल्या 'ये मेरी लाईफ है' या सीरियलच्या माध्यमातून अभिनेत्री शमा सिकंदर प्रसिद्धीच्या झोतात आली. यानंतर शमाने 'बालवीर' या सीरियलमध्ये 'भयंकर परी' ची भूमिका निभावली होती. 

मीडियात आलेल्या वृत्तांनुसार, शमा सिकंदरने एकेकाही त्रस्त होऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर शमाने शॉर्ट फिल्म 'सेक्सोहॉलिक'च्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये पूनरागमन केलं होतं. या शॉर्ट फिल्ममध्ये शमाचा दमदार अभिनय, हॉट सीन आणि किसींग सीन्सचा भडीमार होता. 

शमा सिकंदर एक चांगली मॉडेल आहे आणि तीने २०१० मध्ये आपली एक डिझायनिंग कंपनी सुरु केली आहे. शमा सोशल मीडियात खूपच अॅक्टिव्ह असते.