शाहरुख खानच्या घरी चोरी,अभिनेत्याच्या मुलीवर संशय?

ती तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Updated: Mar 4, 2022, 03:48 PM IST
शाहरुख खानच्या घरी चोरी,अभिनेत्याच्या मुलीवर संशय?  title=

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या फॅशनसाठी विशेष ओळखले जातात. त्यांच्या स्टाईल आणि आऊटफिटची विशेष चर्चा रंगते. सध्या अभिनेता संजय कपूर यांची लेक शनाया कपूर तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.

तिने शाहरुखच्या लेकीचे कपडे परिधान केल्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबाबत तिने कॅप्शनमध्ये स्वत:चं कबुली दिली आहे. 

करण जोहरने आज तीन नवीन कलाकारांना लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी संजय कपूरची मुलगी शनाया कपूर ही देखील एक आहे. 'बेधडक' चित्रपटातून शनाया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटाची घोषणा होण्यापूर्वीच शनाया सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे.

शनाया कपूर लवकरच करण जोहरच्या सिनेमात दिसणार आहे. अभिनयाच्या दुनियेत करिअर करण्यासाठी ती बऱ्याच दिवसांपासून तयारी करत आहे. शनायाने बेली डान्सचे प्रशिक्षणही घेतले आहे. ती तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

गेल्या वर्षी तिने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. आता बॉलिवूड डेब्यूच्या बातमीनंतर तिचा हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे.

तिने व्हाईट स्कर्ट परिधान करून जबरदस्त डान्स केला आहे. तिने हा स्कर्ट शाहरुख खानची मुलगी सुहानाकडून घेतल्याचं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने उघड केलं होतं.

सुरुवातीला सुहाना खानच्या आऊटफिटमध्ये शनायाला पाहून बेस्ट फ्रेण्डचा ड्रेस चोरी केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला होता.

जब शनाया कपूर ने 'चुरा' ली थी सुहाना खान की स्कर्ट, डांस वीडियो में खोला था राज

त्यामुळे शनाया देखील सुहानाचे कपडे आपल्या शूट दरम्यान वापरत असल्याची चर्चा सुरु झाली होती. सुहाना आणि शनाया या बेस्ट फ्रेण्डस आहेत. त्यामुळे त्या एकमेकांचे ड्रेस सुद्धा शेअर करताना दिसतात.