Shah Rukh Khan AI Photo With Actress: शाहरूख खानसोबत आपण काम करावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मराठीच्याही अनेक अभिनेत्रींनी शाहरूख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यातून अनेकींनी कामंही केलं आहे. परंतु अशाही काही अभिनेत्री असतील ज्या अजूनही शाहरूख खानसोबत काम करण्यास मनापासून उत्सुक आहेत पण तरीही त्या अजूनही वाटच पाहत आहेत. परंतु त्यांना आशा आहे की आपलं स्वप्न हे कधी ना कधी तरी पुर्ण होईल. सध्या एका अभिनेत्रीनंही अशीच इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी फक्त इच्छाच नाही तर तिनं कृतीही करून दाखवली आहे. हे पाहून तुम्हालाही अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. प्रत्यक्षरीत्या शाहरूखला भेटू शकलो नाही म्हणून काय झालं? यावेळी तिनं चक्क एआयच्या मदतीनं आपला आणि शाहरूख खानचा फोटो शेअर केला आहे. तो पाहून तुम्हाला असं वाटेल जणू त्यांनी एकत्र काम केले आहे.
ही अभिनेत्री नाही परंतु एका लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीची ती पत्नी आहे. आम्ही बोलत आहोत. शशांक केतकर याच्या पत्नीबद्दल. प्रियांका ढवळे हिनं इन्स्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यात शाहरूख खान आणि ती दिसते आहे. शाहरूख खान तिला मेकअप लावताना मदत करतो आहे. असं या फोटोतून दिसतं आहे. जसे की ते दोघं जणं हे एका चित्रपटातून काम करत आहेत. ज्याची एक झलक आपण पाहतो आहोत. यावेळी तिच्या या फोटोला नेटकऱ्यांनी तूफान लाईक केले आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. हा तिचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. चला तर मग पाहुया की या वेळी तिच्या या फोटोत खास असं काय आहे.
हेही वाचा : करण जोहरला पाहून विवेक अग्निहोत्रींनी डोळे फिरवले, फोटोही केला क्रॉप
यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''King Khan ला खरं कधी भेटेन माहित नाही, but निदान A.I. Made it virtually possible!''. यावेळी तिनं हा फोटो AI द्वारे क्रिएट केला आहे. यावेळी नेटकऱ्यांनीही यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शशांक केतकरची प्रियांका ढवळे ही दुसरी पत्नी आहे. याअगोदर शशांक केतकरचं लग्न हे अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्यासोबत झालं होतं. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यांचा वर्षभरातच घटस्फोट झाला होता. 2013 साली आलेल्या 'होणार सुन मी ह्या घरची' या मालिकेतून त्या दोघांनी एकत्र काम केले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. त्यानंतर 2014 साली त्यांनी लग्न केले परंतु पुढच्याच वर्षी त्यांचा घटस्फोट झाला. 2017 साली शशांक केतकरनं प्रियांका ढवळेशी लग्न केले. त्यांना मुलगाही आहे. त्यांचीही सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली असते. प्रियांका ही पेशानं वकील आहे.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.