Vivek Agnihotri Karan Johar : काल 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी पुरस्कार प्राप्त कलाकार यावेळी उपस्थित होते. यावेळी आलिया भट्ट, अल्लू अर्जुन, आर. माधवन, विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी, क्रिती सनन, करन जोहर, वहिदा रेहमान यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्विकारला. पुरस्कार स्विकारताना त्यांना यावेळी अश्रुही अनावर झाले होते. राष्ट्रीय पुरस्काराच्या मानांकित सोहळ्यातही बॉलिवूडमधल्या शीतयुद्धाचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले होते. यावेळी चर्चा होती ती म्हणजे विवेक अग्निहोत्री आणि करण जोहर यांची. आपल्याला सोशल मीडियावर हे माहितीच असेल की विवेक अग्निहोत्री हे अनेक बॉलिवूडवर ताशेरे ओढताना दिसता. सोबतच करण जोहरवरही ते सोशल मीडियावरून वार-प्रहार करताना दिसतात.
राष्ट्रीय पुरस्कार स्विकारण्यासाठी कलाकार हे विज्ञान भवन, दिल्ली येथे उपस्थित होते. यावेळी विवेक अग्निहोत्री आणि करण जोहर यांची चर्चा होती. करण जोहर यावेळी 'शरशेहा' या चित्रपटासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार स्विकारण्यासाठी दिल्लीत पोहचला होता. 2021 साली 'शेरशहा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी या चित्रपटातून महत्त्वाच्या भुमिका निभावल्या होत्या. हा चित्रपट एक बायोपिक होता. कारगिलच्या युद्धात वीरमरण आलेले भारतीय जवान विक्रम बद्रा यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित होता. हा चित्रपट तेव्हा बराच गाजला होता. सोबतच या चित्रपटाचीही जोरात चर्चाही रंगलेली होती. हा चित्रपट करण जोहर यानं निर्मित केला होता. जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार स्विकारण्यासाठी तो पुढे आला तेव्हा विवेक अग्निहोत्री यांचे हावभावही बदलले होते. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला होता.
हेही वाचा : 'लग्न करेन पण...' मंडपात ऐनवेळी अमिताभ बच्चन यांनी सासरच्यांसमोर ठेवलेली 'ही' अट
Such talent. Women power.
— Vivek Ranjan Agnihotri (vivekagnihotri) October 17, 2023
त्याचसोबत या सर्व कलाकरांंनी एकत्र फोटोही शेअर केला होता. त्यावेळी एका बाजूला करण जोहर उभा होता. तोही फोटो त्यांनी क्रॉप करून आपल्या X अकांऊटवरून शेअर केला आहे. त्यांनी वहिदा रेहमान आणि सर्व अभिनेत्रींसोबतही आपले फोटो शेअर केले आहेत. त्याचसोबत त्यांनी या पोस्टला कॅप्शन दिले आहे की, 'वुमर पावर, सच टॅलेंट'. यावरून नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यांची जोराच चर्चा रंगलेली आहे. सध्या यामुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. करण जोहरला अनेकदा तो नेपोटिझमला सपोर्ट करतो म्हणून कायमच ट्रोल केले आहे. विवेक अग्निहोत्री यांनीही त्याच्यावर बरेच आरोप प्रत्यारोप केले आहेत.
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.