मंसूर अली खान यांच्यासोबत लग्न करण्यासाठी शर्मिला टागोर यांनी बदलला होता धर्म

शर्मिला यांनी क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी सोबत लग्न केलं. 

Updated: May 24, 2021, 12:05 PM IST
मंसूर अली खान यांच्यासोबत लग्न करण्यासाठी शर्मिला टागोर यांनी बदलला होता धर्म

मुंबई : शर्मिला टागोर यांनी त्यांच्या काळात आपल्या सौंदर्याने लाखो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केल आहे. शर्मिला यांचे लाखो चाहते आहेत, ज्यात क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौदी यांचाही समावेश आहे. शर्मिला यांनी क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी सोबत लग्न केलं. पण तुम्हाला माहिती आहे की, या दोघांच्या लव्ह स्टोरीच जेवढी चर्चा नव्हती तेवढी या दोघांची चर्चा त्यांच्या लग्नामुळेही बरीच झाली होती. इतकंच नाही तर, शर्मिला यांनी मंसूर यांच्याशी लग्न करण्यासाठीही आपला धर्म बदलला होता.

जेव्हा शर्मिला यांनी लग्नासाठी आपला धर्म बदलला तेव्हा, त्यांनी आपलं नाव बदलून आयशा बेगम ठेवलं. लग्नानंतर शर्मिला देखील  पतौडी  कुटूंबाचा एक भाग बनल्या. शर्मिला आणि मन्सूर हे एकमेकांसाठी बनले आहेत, याची जाणीव त्यांना 1965मध्ये मिळाली जेव्हा ते एका कॉमन मित्राद्वारे पहिल्यांदा भेटले होते.

त्यावेळी शर्मिला यांना पतौडी यांच्या नवाबाबद्दल माहित होतं, परंतु मन्सूर यांना शर्मिलाबद्दल फारसं माहिती नव्हतं. पण तरीही जेव्हा ते शर्मिला यांना भेटले, तेव्हा ते पहिल्याच भेटीत त्याच्यांसाठी वेडे झाले.

शर्मिला टागोर यांनी 1968मध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौदी यांच्याशी लग्न केलं. शर्मिला त्या काळातील बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री होती, तर 'टायगर' पटौदी हे सुप्रसिद्ध क्रिकेट स्टार होते. प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांची लव्हस्टोरी खूप प्रसिद्ध होती.

यातील एक कारण म्हणजे त्यांनी शर्मिला यांना केलेलं अनोख्या पद्धतीचं प्रपोज या मागच कारण मानलं जातं. नवाब  पतौडी  यांनी शर्मिला टागोर यांना प्रपोज करण्यासाठी 7 फ्रिज भेट म्हणून पाठवले होते. एवढेच नव्हे तर त्यानी 4 वेळा गुलाबही त्यांना पाठवली होती.

मन्सूर यांनी कसं केलं प्रपोज
शर्मिला यांनी सांगितलं होतं की, मन्सूर यांनी पॅरिसमध्ये फॉर्मली प्रपोज करण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईला शर्मिलाबद्दल सांगितलं होतं. शर्मिला म्हणाल्या की, 'आम्ही अम्माला भेटायला गेलो होतो आणि तिथेच त्यांनी अम्माला सांगितलं की आम्हाला लग्न करायचं आहे. ते तेथे लग्नाविषयी बोलणार असल्याचं त्यांनी मला सांगितले नव्हतं. यानंतर त्यांनी पॅरिसमध्ये मला प्रपोज केले.'

बंगाली होत्या शर्मिला
शर्मिला बंगाली होत्या, मात्र मन्सूरसोबत लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी आपलं नाव आयशा सुलताना ठेवलं. लग्नानंतर 42 वर्षे एकत्र राहिल्यानंतर टायगर यांचा मृत्यू झाला. 22 सप्टेंबर 2011 रोजी मन्सूर यांचा मृत्यू झाला. शर्मिला आणि टायगर यांची लव्हस्टोरी अजूनही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.