मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांचे सोमवारी मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
गेल्या तीन आठवड्यांपासून ते रुग्णालयात भरती होती. शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी कोलकता येथे झाला. शशी कपूर यांना २०१४ मध्ये चेस्ट इन्फेक्शन झाले होते. त्यावेळी त्यांच बायपास सर्जरी करण्यात आली.
शशी कपूर यांचा भाजा मोहित मारवाह यांनी ट्विटरवरून त्यांच्या निधनाच्या वृत्ताला पुष्टी दिली. शशी कपूर यांनी १६० पेक्षा अधिक चित्रपटात अभिनय केला आहे. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.