'तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है'... राहत इंदौरी यांची ही गाणी ठरली हिट

राहत इंदौरी यांनी पहिलं गाणं 'सर' चित्रपटासाठी लिहिलं होतं.

Updated: May 14, 2021, 07:03 PM IST
 'तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है'... राहत इंदौरी यांची ही गाणी ठरली हिट

मुंबई : राहत इंदौरी यांनी बॉलिवूडसाठी बरीच गाणीही लिहिली आहेत. राहत इंदौरी यांनी पहिलं गाणं 'सर' चित्रपटासाठी लिहिलं होतं. त्यांनी लिहिलेलं 'आज हमने दिल का हर किस्सा' हे गाणं बरंच गाजलं होतं. त्यानंतर त्यांनी खुद्दार, मर्डर, मुन्नाभाई एमबीबीएस, मिशन कश्मीर, करीब, इश्क, घातक आणि बेगम जान  यासारख्या चित्रपटांमध्ये गाणी लिहिली.

एका मुलाखतीमध्ये राहत इंदौरी यांनी हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर बोलताना म्हटलं होतं की, आता चित्रपटातील गाण्यांसाठी 'शब्द' नाहीसे झाले आहेत आणि म्हणूनच शायर आणि शायरी चित्रपटसृष्टीपासून दूर जात आहे. आता चित्रपटांमध्ये ढिंक चिका, ढिंक चिका. यासारख्या गाण्यांची मागणी वाढली आहे. या गाण्यांमध्ये कवीचं कोणतच काम उरलं नाही. अशी गाणी कवी लिहू शकत नाहीत.

राहत इंदौरी यांनी बॉलिवूड चित्रपटांसाठी लिहिलेली काही प्रसिद्ध गाणी

'आज हमने दिल का हर' किस्सा - (सर)
'तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है' - (खुद्दार)
'तुम मानो या न मानो, पर प्यार इंसां की जरूरत है' - (खुद्दार)
'रात क्या मांगे एक सितारा' - (खुद्दार)
'दिल को हजार बार रोका रोका रोका' - (मर्डर)
'एम बोले तो मास्टर मैं मास्टर' - (मुन्नाभाई एमबीबीएस)
'बुम्बरो बुम्बरो श्याम रंग बुम्बरो' - (मिशन कश्मीर)  
'चोरी-चोरी जब नजरें मिलीं, चोरी चोरी फिर नींदें उड़ीं' - (करीब)
'देखो-देखो जानम हम, दिल अपना तेरे लिए लाए' - (इश्क़)  
'नींद चुराई मेरी किसने ओ सनम तूने - (इश्क़)
'कोई जाए तो ले आए मेरी लाख दुआएं पाए' - (घातक)

काही दिवसांपूर्वी प्रख्यात कवी आणि गीतकार राहत इंदौरी यांचं गेल्यावर्षी निधन झालं. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना इंदूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. भोपाळ मधील स्थानिक पत्रकार शूरैह नियाझी यांच्या मते, 70 वर्षीय राहत इंदौरी यांना कोरोना आणि श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे रूग्णालयात दाखल केलं गेलं होतं. यात त्यांना हृदयविकाराचा झटका देखील आला आणि यांत त्यांचा मृत्यू झाला.

इंदूरच्या अरबिंदो हॉस्पिटलमधील डॉ विनोदी भंडारी यांनी एएनआयला सांगितलं की, त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यात आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. डॉक्टर भंडारी म्हणाले की, त्यांना 60 टक्के न्यूमोनिया झाला होता. राहत यांनी ''कोविडची सुरुवातीची लक्षणं दिसल्यानंतर कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली'' असल्याची माहिती सोशल मिडियाद्वारे दिली होती.