मुंबई : सिक्किमच्या गंगटोकमध्ये जन्मलेल्या डॅनी डेन्जोंगपा यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1948 मध्ये झाला. डॅनी 72 वर्षांचे आहेत. आमच्या सहयोगी फिल्मफेअर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत डॅनी यांनी परवीन बाबीबद्दल काही आठवणी सांगितल्या आहेत . डॅनी यांनी सांगितलं की, ते आणि परवीन चार वर्ष एकत्र होते, पण नंतर दोघांनीही वेगवेगळे रस्ते निवडले
एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत डॅनी म्हणाले की, ''तेव्हा आम्ही तरुण होतो. आम्ही चार वर्षे एकत्र राहिलो, मग आमचे मार्ग वेगवेगळे झाले. आम्ही दोघांनी एकत्र छान वेळ घालवला.
आम्ही खुप चांगले फ्रेंड्स आहोत. नंतर मी किम आणि परवीन कबीर बेदी आणि महेश भट्ट यांना डेट करत होती. आम्ही जुहू परिसरातील एकाच कॉलनीमध्ये राहत होतो.
डॅनीची मैत्रीण किम परवीनवर नाराज होऊ लागली
डॅनी कायमच परवीन बाबी यांच्यासाठी अवेलेबल असतं. डॅनी बर्याचदा परवीन यांना डिनरसाठी बोलवाये. मात्र जेव्हा आपल्या बॉयफ्रेंन्डची एक्स आपल्या घरी सतत येते, तेव्हा कोणालाही ते आवणार नाही. 'परवीन आणि डॅनीच्या या अशा वागण्यावर किम अस्वस्थ झाल्या होत्या. डॅनी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, बर्याच वेळा असं घडलं की, जेव्हा मी किमसोबत माझ्या घरी गेलो तेव्हा बेडरूममध्ये परवीन टीव्ही पहात होती.'
डॅनीने पुढे म्हणाले, एकदा डिनर करत असताना, मला समजलं की, परवीन यांना मानसिक आजार आहे. 'आम्ही सगळे जेवत होतो. टेबलावर चंदेरी कागदाचे काही तुकडे तिथे पडले होते. ते उचलण्यासाठी मी उठलो. परवीन भयभीत झाली. तेव्हा महेश भट्ट यांनी सांगितले की, परवीन आजारी आहे. तिला मानसिक आजार आहे. म्हणूनच तिची चिडचिड होत आहे.'
त्यानंतर एकवेळ अशी आली जेव्हा परवीन यांनी डॅनी यांच्यासोबत पूर्णपणे बोलणं थांबवलं. डॅनी म्हणातात, 'एक दिवस अमिताभ बच्चन यांची एक मुलाखत वर्तमानपत्रात आली. त्यात त्यांनी माझा चांगला मित्र म्हणून उल्लेख केला होता. परवीन यांनी ती मुलाखत वाचली. तिच्या आजारपणामुळे तिला भलते सलते संशय येवू लागले.
तिला असं वाटू लागला की,काही लोकांकडून तिला धोका मिळाला आहे. संध्याकाळी मी परवीन यांना भेटायला गेलो. तिने मला दरवाज्याच्या किहोलमधून पाहिलं आणि दार उघडले नाही. 'ती मला आतूनच अमिताभ यांचा एजंट म्हणू लागली. ती माझ्याकडे पाहून जोर-जोरात किंचाळू लागली. या प्रकारानंतर मला तिची भीती वाटू लागली आणि अशा प्रकारे मी तिच्यापासून दूर गेलो'
जेव्हा परवीन बाबी यांचं निधन झाले तेव्हा डॅनीही अंत्यसंस्कारात हजर होते. कोणत्याही मित्रासाठी हा सगळ्यात हृदयस्पर्शी क्षण असेल. एकेकाळी निर्माते आणि दिग्दर्शकांची गर्दी असणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणात मात्र त्याच्यांसोबत कोणीचं नव्हतं. डॅनीसोबत या अंत्यसंस्कारत महेश, कबीर, जॉनी बक्षी, रंजीत आणि निर्माता हरीश शाह यांच्याशिवाय खूपच लोकं होती.