'मुझसे कोई प्यार ही नही करता' म्हणत शहनाजचा व्हिडिओ तुफान व्हायरल

शहनाज गिलने यशराज मुखातेसोबत एक मजेदार व्हिडिओ बनवला आहे.

Updated: Jan 22, 2022, 03:50 PM IST
'मुझसे कोई प्यार ही नही करता' म्हणत शहनाजचा व्हिडिओ तुफान व्हायरल title=

मुंबई : शहनाज गिलने यशराज मुखातेसोबत एक मजेदार व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये ती 'बोरिंग डे'वर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओला यशराज मुखाते आणि शहनाज गिल यांनी आवाज दिला आहे. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत 722,576  हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनेक लोकं यावर कमेंटही करत आहेत.

शहनाज गिलने यशराज मुखातेसोबत 'बोरिंग डे' वर एक मजेदार व्हिडिओ बनवला आहे
यावर कमेंट करत अर्चना पूरण सिंह यांनी लिहिलं की, 'शानदार, यशराज खूप दिवसांनी मजा आली.' तर अनेक लोकं त्यावर  लाफ्टर इमोजीही शेअर करत आहेत.

व्हिडिओमध्ये शहनाज गिल बिग बॉस 13 मध्ये असल्याचं दिसत आहे. आजचा दिवस खूप बोरींग आहे, घरातील लोकं खूप बोरिंग आहेत. माझ्यावर कोणी प्रेम नाही करत. असल्याचंही ती या व्हिडिओत  सांगत आहे. हे डॉयलॉग गाणं  यशराज मुखातेने बनवलं आहे. या गाण्यात यशराज आणि शहनाज दोघंही डान्सही करताना दिसत आहेत.

या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये आरती सिंगही दिसत आहे. शहनाज गिलने व्हिडिओ शेअर करत अनेक स्टार्सवर कमेंट केल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शहनाज गिलच्या पेजवरील या व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेक लाफ्टर इमोजीसह त्यावर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिलं, 'बेबी तू आमचा दिवस मजेदार बनवते' तर दुसऱ्याने लिहिलं, 'मी बिग बॉस तेरा मिस करत आहे'. तर अजून एकाने लिहिलंय, 'हे छान आहे' हे लक्षात घेण्यासारखं आहे की, बिग बॉस 13 मधून शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी लोकप्रिय झाली होती. दोघांनाही चांगलीच पसंती मिळाली होती. दोघंही एकमेकांच्या जवळ आले होते. गेल्या वर्षी सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू झाला होता. तो बिग बॉस 13 चा विजेता देखील होता.