Stroke Symptoms : आजकाल स्ट्रोक म्हणजे झटका येण्याच्या घटना वेगाने वाढत आहेत. स्ट्रोक सामान्यत: वरिष्ठांमध्ये दिसून येतो, परंतु आता तरुणांमध्ये सुद्धा वाढत आहे. विशेषत: 20 ते 30 वर्षांच्या तरुणांमध्ये स्ट्रोकची सुरुवातीची लक्षणे हळू-हळू आणि 'साइलेंट' प्रमाणात दिसून येत आहेत.
स्ट्रोकची लक्षणे जर वेळेवर ओळखली तर स्ट्रोकचा धोका कमी केला जाऊ शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते स्ट्रोकची अशी काही लक्षणे आहेत ज्यांना वेळेवर ओळखणं खूप गरजेचं आहे. इथे तुम्ही स्ट्रोकची अशी लक्षणे जाणून घेऊ शकता ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे.
स्ट्रोकचं सगळ्यात 'साइलेंट' किंवा छुपं लक्षण म्हणजे अचानक अस्पष्ट दिसू लागणं. असं तेव्हाच होतं जेव्हा स्ट्रोकचा परिणाम मेंदूच्या अशा भागावर होतो जो दृष्टीला नियंत्रित करतो.
स्ट्रोकच्या दरम्यान तीव्र डोकेदुखी आणि चक्कर येणं ही सामान्य लक्षणे असू शकतात. हे तेव्हा होतं जेव्हा मेंदूमध्ये रक्तस्त्राव योग्यरित्या होत नाही. अशात जर तुम्हाला अचानक डोकेदुखी सोबत चक्कर येत असेल तर या हलक्यात घेऊ नका.
हेही वाचा : आरोग्यसंपन्न जीवनासाठी ABC ज्यूस: पोषणाचा नवा मंत्र
स्ट्रोकचं अजुन एक लक्षण शरीराच्या कोणत्या भागात अशक्तपणा किंवा तो भाग सुन्न होणं आहे. हे सामान्यत: शरीराच्या एका बाजुच्या हात, पाय किंवा चेहऱ्यामध्ये जाणवतं. जर तुम्हाला शरीराच्या कोणत्याही भागात अशक्तपणा किंवा तो भाग सून्न वाटायला लागला तर ते स्ट्रोकचं लक्षण असू शकतं.
स्ट्रोकच्या दरम्यान मानसिक स्थिती वर सुद्धा परिणाम होऊ शकतो. अचानक चिंता, अस्वस्थता किंवा आपल्या आसपासची परिस्थिती अनोळखी वाटणे हे स्ट्रोकचे अजुन एक महत्वपूर्ण लक्षण आहे. जर ही लक्षण दिसत असतील तर वैद्यकीय गरज असू शकते.
स्ट्रोकमुळे स्नायू कडक होणे आणि पेटके येऊ शकतात. अशात जर शरीराच्या कोणत्याही भागात स्नायू कडक जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. हे मेंदू मध्ये उद्भवणाऱ्या समस्येचं लक्षण असू शकतं.