सिद्धार्थ शुक्लासोबत शहनाजने केलं होतं लग्नाचं प्लानिंग, व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 

Updated: Sep 6, 2021, 04:31 PM IST
सिद्धार्थ शुक्लासोबत शहनाजने केलं होतं लग्नाचं प्लानिंग, व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही title=

मुंबई : सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 'बिग बॉस 13' मध्ये प्रेक्षकांनी त्याला इतकं पसंत केलं की, या दोघांना चाहत्यांनी सिडनाज नावाने हाक मारायला सुरुवात केली. ईथूनच सिद्धार्थ आणि शहनाजची मैत्री प्रसिद्ध झाली. कधी दोघंही एकमेकांशी भांडताना दिसले तर कधी ते एकमेकांसोबत एकत्र दिसले. शहनाजने शोमध्ये अनेकवेळा तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. शहनाजचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात ती एका टास्क दरम्यान तिच्या लग्नाचं प्लानिंग करताना दिसत आहे.

शहनाजचं प्लानिंग
प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. सीजन 13 मध्ये विकास स्वतः पाहुणा म्हणून या शोमध्ये आला होता. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा सगळ्या स्पर्धकांना एक टास्क देण्यात आला होता आणि त्यांना त्यांच्या अॅक्टमधून सगळ्यांना हसवायचं होतं. कार्य म्हणून, शहनाजा सांगते की, तिचं लग्न सिद्धार्थशी झालं तर ते कसं होईल. ती म्हणते की 'जर आमचं लग्न होत असेल तर असीम आमच्या लग्नावर नाराज जिजा असता. हा पहिला जिजा असेल जो सालीपेक्षा जास्त सुंदर दिसतो.

विकास खन्ना यांनी शेअर केला व्हिडिओ 
व्हिडिओसोबत, विकासने कॅप्शनमध्ये लिहिलं- 'जरी मी फक्त एक दिवस बिग बॉसच्या घरात घालवला पण त्यापैकी बहुतेकांशी खूप जोडला गेलो होतो. काळ कसा बदलला हे बघून माझं हृदय तुटतं. सिद्धार्थच्या कुटुंब आणि चाहत्यांना शक्ती मिळो. बिग बॉस 13 विजेता सिद्धार्थ शुक्लाचं 2 सप्टेंबर रोजी निधन झाले. सिद्धार्थ फक्त 40 वर्षांचा होता.