घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; पाहा अभिनेत्री मात्र घेतेय सुट्ट्यांची मजा

हिंदी चित्रपटसृष्टीसह वेब सीरिजमध्येही बरीच प्रसिद्ध असणारी ही अभिनेत्री आहे.... 

Updated: Sep 6, 2021, 04:16 PM IST
घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; पाहा अभिनेत्री मात्र घेतेय सुट्ट्यांची मजा
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : सेलिब्रिटी वर्तुळात नात्यांना कधी आणि कोणतं वळण मिळेल याचा नेम नसतो. अनेकदा सुरळीत चाललेल्या एखाद्या नात्यात वादळ येतं. तर कुठे नात्यांची समीकरण बिघडलेली दिसत असतानाच एका नव्या नात्याचा जन्म होतो. सेलिब्रिटी आणि त्यांच्या रिलेशनशिल्प यामुळेच कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. 

सध्या यामध्येच नजरा वळवतेय ती म्हणजे एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आणि तिच्या घटस्फोटाच्या चर्चा. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह वेब सीरिजमध्येही बरीच प्रसिद्ध असणारी ही अभिनेत्री आहे, समंथा रुथ प्रभू (samantha Ruth Prabhu). 

साऊथ सुपरस्टार म्हणून ख्याती असणाऱ्या अभिनेता नागार्जुन यांची ही सून, अभिनेता नागचैतन्य याची पत्नी समंथा ही वैवाहिकत नात्यातून विभक्त होत असल्याच्या आणि तिच्या घटस्फोटाच्या चर्चांना कमालीचं उधाण आलं आहे. या साऱ्यामध्येच समंथा मात्र वेगळ्याच वाटांवर निघाल्याचं दिसत आहे. 

जगविख्यात खेळाडूसोबत रिलेशनशिपमध्ये किम शर्मा; पाहा रोमॅन्टिक पोस्ट 

 

इन्स्टाग्रामवर समंथानं ती या क्षणाला नेमकं काय करत आहे, याबाबतचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये ती आपली खास मैत्रीण शिल्पा रेड्डी हिच्यासोबत कायाकिंग करताना दिसतेय, तर कुठे निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेतना दिसतेय. समंथाचे हे फोटो पाहता ती सध्या सर्व धकाधकीपासून दूर जात काही निवांत क्षणांचा आनंद घेताना दिसतेय. 

दरम्यान, इथं समंथाच्या सुट्टीचेही फोटो व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वीच तिनं सोशल मीडिया हँडलवरचं नाव बदललं होतं. समंथा अक्किनेनी अशी तिची यापूर्वी ओळख होती. पण, आता मात्र तिनं  S इतक्याच अक्षराचा वापर आपली ओळख सांगण्यासाठी केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by S (@samantharuthprabhuoffl)

समंथानं केलेल्या या बदलांची कुणकूण माध्यमांना लागली आणि अगदी चाहत्यांपासून या माध्यमांपर्यंत तिच्या घटस्फोटाच्या आणि विभक्त होण्याच्या चर्चांनी जोर धरला. खुदद् समंथानंच योग्य वेळ येताच योग्य त्या गोष्टी सांगितल्या जातील ही बाब स्पष्ट केली. त्यामुळं आता समंथाच कोणती अधिकृत घोषणा करते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.