शिल्पा शेट्टीकडून 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला अंडरवर्ल्डची धमकी

राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणावर जामीनावर बाहेर 

Updated: Oct 28, 2021, 10:39 AM IST
शिल्पा शेट्टीकडून 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला अंडरवर्ल्डची धमकी

मुंबई : 'कामसूत्र' सिनेमाची अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) गेल्या काही दिवसांपासून पोर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आहे. या प्रकरणात अडकलेले अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा जामीनावर बाहेर आहे. मात्र आता शर्लिन चोप्राने या सेलिब्रिटी कपलवर गंभीर आरोप केले आहेत. शर्लिनने सांगितल्याप्रमाणे शिल्पाने तिला अंडरवर्ल्डची धमकी दिली आहे. 

शर्लिनने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना याचा खुलासा केला आहे. ती म्हणाली, 'शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राने मला अंडरवर्ल्डकडून धमकी दिली होती. पुढे शर्लिनने असेही म्हटले आहे की, 'त्याने आता मला मानहानीची नोटीस पाठवली आहे, पण मी घाबरणार नाही. मी पोलिसांना माझे म्हणणे नोंदवण्याची विनंती करते जेणेकरून माझ्या तक्रारीची दखल घेतली जाऊ शकते.

शर्लिनकडून 75 करोड रुपयांची मागणी

या बातमीत असेही सांगण्यात आले आहे की, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी शर्लिनकडे मानसिक छळासाठी 75 कोटी रुपयांची मागणी करणारी नोटीस दिली होती. ज्याची काउंटर नोटीस शर्लिनने पाठवली आहे.

शर्लिनने दाखल केली तक्रार

अलीकडेच शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरुद्ध लैंगिक छळ, फसवणूक आणि गुन्हेगारी धमकीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनीही शर्लिन चोप्रावर मानसिक छळ आणि मानहानीचा दावा करत ५० कोटी रुपयांचा गुन्हा दाखल केला आहे.