लग्नानंतर शिबानीच्या हातावर फरहानच्या नावाचा नाही तर असा टॅटू?

अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि अभिनेता फरहान अख्तरने 19 फ्रेब्रुवारी रोजी लग्न करत नव्या आयुष्याला सुरूवात केली.  

Updated: Feb 28, 2022, 03:55 PM IST
लग्नानंतर शिबानीच्या हातावर फरहानच्या नावाचा नाही तर असा टॅटू?  title=

मुंबई : अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि अभिनेता फरहान अख्तरने 19 फ्रेब्रुवारी रोजी लग्न करत नव्या आयुष्याला सुरूवात केली. लग्नानंतर दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दोघांनी हिंदू किंवा मुस्लीम पद्धतीत लग्न केलं नाही तर फक्त वचन देत लग्न केलं. या सोहळ्यानंतर  21 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांनी विवाह नोंदणी केली. त्यामुळे शिवाणी आणि फरहान 21 फेब्रुवारी रोजी कायद्यानुसार विवाह बंधनात अडकले. 

शिबानीसाठी 21 तारीख देखील महत्त्वाची असल्याचं व्हायरल फोटोंमधून दिसत आहे. तिने रोमनमध्ये हातावर 21-02-2022 तारीख टॅटू म्हणून काढली आहे. टॅटू फ्लॉन्ट करत तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही दिवसांपूर्वी  शिबानीने स्वतःच्या नावात देखील बदल केला आहे. तिने सोशल मीडियावर शिबानी दांडेकर-अख्तर असं नाव लिहिलं आहे. एवढंच नाही तर तिने मिसेस अख्तर देखील लिहिलं आहे. 

शिबानी सध्या लग्नानंतर बदलेल्या नावामुळे आणि टॅटूमुळे चर्चेत आली आहे. शिबानी आणि फरहानने अगदी साध्या पद्धतीत लग्न केलं. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता ठराविक पाहुण्याच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं. 

दरम्यान व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये फरहान आणि शिहानीच्या प्रेमाला उधाण आल्याचं दिसत आहे. अनेक फोटो असे आहेत ज्यामध्ये फरहान आणि शिवानी एकमेकांच्या प्रेमात मग्न झाल्याचं दिसून येत आहे.