Super Dancer 4 : Shilp Shetty स्वीकारते इतकं मानधन; ऐकून व्हाल थक्क

गीता कपूर, अनुराग बासू यांचं मानधन देखील...  

Updated: Apr 12, 2021, 03:48 PM IST
Super Dancer 4 : Shilp Shetty स्वीकारते इतकं मानधन; ऐकून व्हाल थक्क

मुंबई : 'सुपर डान्सर 4' प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन करत आहे. शोमधील एका पेक्षा एक स्पर्धक, होस्ट, परीक्षकांची मस्ती यासर्व गोष्टींमुळे 'सुपर डान्सर 4' शो तुफान चर्चेत आहेत. शोमध्ये परीक्षकाच्या गादीवर बसणारे कलाकारांचं मानधन ऐकून तुम्ही थक्क व्हाल. परीक्षक एका एपिसोडसाठी लाखो रूपये मानधन घेतात. गीता मा, अनुराग बासू यांच्यापेक्षा अभिनेत्री शिल्पा शेट्टी अधिक मानधन स्वीकारते. तर आज जाणून घेवू शोमधील परीक्षक आणि होस्ट एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात. 

शिल्पा शेट्टी कायम तिच्या सौंदर्यआणि एक्सप्रेशनने चाहत्यांना घायाळ करते. योगा मास्टर आणि फिटनेस फ्रिक असलेली शिल्पा शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडण्यासाठी तब्बल 18 लाख रूपयांचं मानधन फक्त एका एपिसोडसाठी स्वीकारते. पण यंदाच्या शोसाठी तिने 20 लाख रूपयांचं मानधन स्वीकारलं आहे. 

शिल्पानंतर गीता मा आणि अनुराग बासूचा नंबर लागतो. गीता मा एका एपिसोडसाठी 15 लाख रूपये स्वीकारते, तर अनुराग बासू एका एपिसोडसाठी 10 लाख रूपये घेतो. शोचे होस्ट देखील एका एपिसोडसाठी चांगलीचं रक्कम घेतात. शोच्या होस्टमुळे प्रत्येक एपिसोड रंगतदार होतो. 

टीव्ही अभिनेता, मॉडेल आणि डान्सर ऋत्विक (Rithvik Dhanjani) एका एपिसोडसाठी 5 लाख रूपये स्वीकारतो. तर परितोष त्रिपाठी (Paritosh Tripathi)ला एका एपिसोडसाठी 4 लाख रूपये स्वीकारतो.