शिल्पा शेट्टी भविष्यासाठी घेऊ शकते मोठा निर्णय; पोस्ट करत दिला इशारा

शिल्पाच्या आयुष्यात मोठे बदल...

Updated: Sep 18, 2021, 02:07 PM IST
शिल्पा शेट्टी भविष्यासाठी घेऊ शकते मोठा निर्णय; पोस्ट करत दिला इशारा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यानंतर शिल्पाच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत. पण वाईट प्रसंगांना कुरवाळत न बसता शिल्पाने तिचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू केलं आहे. पतीचं नाव पॉर्नोग्राफी प्रकरणात आल्यानंतर शिल्पा काही काळ सोशल मीडिया आणि चित्रीकरणापासून दूर होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर प्रेरणा देणाऱ्या पोस्ट शेअर करत आहे. आता देखील शिल्पाने एक पोस्ट शेअर केली आहे. 

शिल्पाने अमेरिकन लेखक कार्ल बार्ड लिखित पुस्तकाचं एक पान शेअर केलं आहे. ज्यामध्ये, 'आयुष्यातून कोणी जावू शकत नाही. पण आपण नवी सुरूवात करू शकतो. कोणीही आता पासून नवी सुरूवात करून शकतो. व्यक्ती आपला बराच वेळ आपल्या वाईट निर्णय आणि चुकांबद्दल विचार करण्यात घालवतो. आपण हुशार, धैर्यवान किंवा खूप चांगले असू. 

'आपण कितीही विचार केला तरी आपण आपला भूतकाळ बदलू शकत नाही. पण योग्य निर्णय घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. मागील चुकांची पुनरावृत्ती न करता आपल्या सभोवतालच्या लोकांशी चांगले रहा. आपल्याकडे स्वत:ला बदलण्यासाठी अनेक संधी असतात...' सध्या शिल्पाची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.'

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी माता वैष्णो देवीच्या दरबारात जाऊन नतमस्तक झाली. पती राज कुंद्राला अटक झाल्यापासून शिल्पा शेट्टी या दिवसात खूपच त्रस्त आहे, अशा परिस्थितीत शिल्पा राज आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी नवस मागण्यासाठी वैष्णो देवीला पोहोचली.