Shilpa Shetty कडून घटस्फोटाचा इशारा मिळताच Raj Kundra ची कोर्टाकडे धाव

स्मॉल स्क्रिनवरील रिअ‍ॅलिटी शो सुपर डान्सर चॅप्टर 4 ची परिक्षक शिल्पा शेट्टी गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.

Updated: Sep 20, 2021, 10:21 AM IST
Shilpa Shetty कडून घटस्फोटाचा इशारा मिळताच Raj Kundra ची कोर्टाकडे धाव

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील रिअ‍ॅलिटी शो सुपर डान्सर चॅप्टर 4 ची परिक्षक शिल्पा शेट्टी गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात जेलमध्ये आहे. अलीकडेच राज कुंद्रा यांनी न्यायालयात जामीन याचिका दाखल केली आहे. या दरम्यान, राज कुंद्राने दावा केला आहे की या प्रकरणात त्याला बळीचा बकरा बनवण्यात येत आहे. पुरवणी आरोपपत्रात त्याच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही.

काही वेळापूर्वी, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने राज कुंद्रासह तीन लोकांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, राज कुंद्रा आपल्या अ‍ॅपचे यूजर्स 2 वर्षात 3 वेळा वाढवू इच्छित होते. या अ‍ॅपद्वारे 8 पट नफा मिळवण्याची राज कुंद्राची योजना होती. राज कुंद्रा यांनी 119 चित्रपट केले होते, जे त्यांना 8.84 कोटी रुपयांना विकायचे होते. घोटाळा उघड झाल्यानंतर राज कुंद्रा यांनी आपल्या अ‍ॅपमधील मजकूर हटवण्याचा प्रयत्न केला.

हा अहवाल समोर आल्यानंतर राज कुंद्रा यांनी कोर्टात धाव घेतली. राज कुंद्रा यांनी म्हटले आहे की, त्यांच्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. राज कुंद्राचा हॉटशॉट अ‍ॅपच्या सामग्रीशी कोणताही संबंध नाही. अशा स्थितीत पुराव्याअभावी त्याला जामीन देण्यात यावा. राज कुंद्राला 1 जुलै रोजी पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती.

शिल्पा शेट्टीचा घटस्फोटाचा इशारा?
अलीकडेच शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शिल्पा शेट्टीने एका पुस्तकाचे पेज शेअर केले आहे. या पेजवर लिहिले आहे, जे घडले ते कोणीही बदलू शकत नाही, पण आपण आपला उद्या सुधारू शकतो. योग्य निर्णय घेऊन आपल्याला नव्याने सुरुवात करावी लागेल.