समंथा आणि नागा चैतन्याच्या लग्नातील काही रंजन गोष्टी, ज्या जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

सामंथा आणि नागा या दोघांच्या जोडीची सध्या चर्चा आहे ती, त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे

Updated: Sep 27, 2021, 04:19 PM IST
समंथा आणि नागा चैतन्याच्या लग्नातील काही रंजन गोष्टी, ज्या जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

मुंबई : ग्लॅमर जगतातील जोडप्यांपैकी एक असलेल्या सामंथा आणि नागा या दोघांच्या जोडीची सध्या चर्चा आहे ती, त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे. सामंथा (Samantha akkinen) आणि नागाचे (Naga chaitanya) नाते आता घटस्फोटाच्या वळणावर पोहोचले आहे. या दोघांचे लग्न थोड्याच काळासाठी टिकले, 2017 मध्ये या जोडप्याने गोव्यात भव्य डेस्टिनेशन वेडिंग केले. हे लग्न इतके भव्य होते की, त्याची चर्चा भारतातच नाही तर जगभरात झाली. (Samantha akkine and Naga chaitanya wedding)

कारण या लग्नाचे बजेट 10 कोटी असल्याचे सांगितले जाते आणि लग्नातील सर्वात मोठा खर्च वधू -वरांच्या दागिन्यांवर करण्यात आला. लग्नाच्या वेळी, सामंथाने सोन्याचे जड आणि मौल्यवान नायक मोत्यांचे दागिने घातले. यासह, अहवालांनुसार, असे म्हटले जाते की, सामंथाने लग्नात परिधान केलेली रेशीम साडी होती ज्यावर सोन्याची जरी होती.

हैदराबादच्या एन-कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा समारंभ झाला. या विशेष दिवशी, सामंथा ने क्रिशा बजाज यांनी डिझाईन केलेली साडी घातली होती. त्यावर तिने या ऑफ शोल्डर ब्लाउज कॅरी केले होते. या लूकमध्ये सामंथा राणीसारखी दिसत होती.

सामंथाच्या साडीतील विशेष गोष्ट म्हणजे त्यात सामंथा आणि नागाची प्रेमकथा दाखवण्यात आली होती. जी सोन्याच्या जरीने डिझान केले होते. त्याचवेळी नागा निळ्या रंगाचा सूट परिधान घातला होतो. त्याचा लूक देखील फार सुंदर होता.

सामंथा (Samantha akkinen) आणि नागा यांनी गोव्यात दोन रीतीरिवाजांनुसार लग्न पार पडले. हिंदू लूक पूर्ण करण्यासाठी तिने मंदिराचे दागिने घातले होते, ज्यात अभिनेत्री खूप सुंदर दिसत होती. दुसरीकडे, नागा रेशमी धोती आणि शर्टमध्ये देखणा दिसत होता.

ख्रिश्चन लग्नात, समंथा क्रिशा बजाजच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये एखाद्या परी सारखी चमकत होती.

तिच्या मेहंदी सोहळ्यासाठी, सामंथा ने कृष्णा बजाजने डिझाइन केलेले निळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता. तिच्या लेहेंग्यावर भरतकाम केलेला होता, ज्यामध्ये काचेचे बीडिंग, सेक्विन आणि क्रिस्टल वापरले होते.

सामंथा आणि नागा (Naga chaitanya) यांनी त्यांच्या भव्य लग्नात सुमारे 10 कोटी रुपये खर्च केले होते. या लग्नात 150 लोक उपस्थित होते. सामंथा आणि चैतन्याने त्यांच्या खास पाहुण्यांसाठी चार्टर्ड फ्लाइट बुक केली होती, ज्यात साऊथचे स्टार महेश बाबू, प्रभास, चिरंजीवी, अल्लू अर्जुन, राम चरण आणि काही इतर लोकांचा समावेश होता.

आता या दोघांच्या घटस्फोटानंतर सामंथाला दिल्या जाणाऱ्या पोटगीची रक्कम चर्चेचा विषय बनली आहे. पोटगीची ही रक्कम लग्नाच्या संपूर्ण बजेटपेक्षा पाचपट जास्त आहे. असे सांगितले जात आहे की, सामंथाला घटस्फोटासाठी पोटगी म्हणून एकूण 50 कोटी रुपये मिळतील, ज्यात चालू मालमत्तांचा समावेश आहे.