शिल्पा शेट्टीचा सोशल मीडियाला रामराम; ...म्हणून उचललं टोकाचं पाऊल

 अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे

Updated: May 12, 2022, 04:33 PM IST
शिल्पा शेट्टीचा सोशल मीडियाला रामराम; ...म्हणून उचललं टोकाचं पाऊल title=

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. सोशल मीडियावर काळ्या रंगाचा फोटो पोस्ट करत तिने सोशल मीडियातून सुट्टी घेत असल्याचं म्हटलं आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे आणि अभिनेत्रीने असं नेमकं करण्यामगचं कारण काय आहे?  हे जाणून घ्यायचं आहे.

शिल्पाचा सोशल सोशल मीडियाला रामराम
शिल्पा शेट्टीने आज म्हणजेच १२ मे रोजी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सांगितलं की, इंस्टाग्राम आणि ट्विटर या दोन्हींमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिल्पानेही याबाबत एक पोस्ट शेअर केली असून तिने असं का केलं हे देखील सांगितलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने यामागचं कारण सांगितलं. तिने लिहिलं, 'मला एकाच गोष्टीचा कंटाळा आला आहे, सगळं काही एकसारखं वाटू लागलंय. जोपर्यंत मला नवा अवतार मिळत नाही तोपर्यंत मी सोशल मीडियापासून दूर राहाणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राज कुंद्रा देखील सोशल मीडियावर नाही
शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे 25 मिलीयनहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि या सगळ्यांची निराशा करत शिल्पाने हा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी अभिनेत्रीचा पती राज कुंद्रानेही जामिनावर सुटल्यानंतर सोशल मीडियाचा निरोप घेतला होता. लोकं त्याला वाईटरित्या ट्रोल करत होते आणि त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला.