चित्रपट समिक्षकाचा मृतदेह तीन दिवस घरातच, मृत्यूमागचं कारण काय?

चित्रपट विश्वाला मोठा धक्का,  करण जोहरने व्यक्त केलं दुःख

Updated: Aug 3, 2021, 10:05 AM IST
चित्रपट समिक्षकाचा मृतदेह तीन दिवस घरातच, मृत्यूमागचं कारण काय? title=

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट समिक्षक राशिद ईरानी यांचं निधन झालं आहे. ते  74 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. राशिद ईरानी यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्थिर होती. ते घरात एकटे असल्यामुळे त्यांच्या निधनाची माहिती कोणाला कळाली नाही. सोमवारी त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं. राशिद ईराई यांचे मित्र रफीक इलियास यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी त्यांचं निधन झालं. 

रफीक म्हणाले,  'दक्षिण मुंबईत असलेल्या राहत्या घरात 30 जुलै रोजी राशिद यांनी अखेरचा श्वास घेतला. मनाला चटका देणारी ही घटना आहे. शुक्रवारी सकाळी अंघोळ करतना त्यांचं निधन झालं, कारण त्यांचा मृतदेह बाथरूममध्ये होता. ते परदेशात गेले आहेत असं आम्हाला वाटलं.' अखेर पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेतल्यानंतर राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला.

दिग्दर्शक करण जोहरने देखील त्यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे. करण म्हणाला, 'तुमच्या आत्म्याला शांती मिळू दे... आपल्या सर्व भेटी माझ्या कायम लक्षात राहतील....'