Saba Ibrahim Miscarriage: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शोएब इब्राहिमची बहीण सबा इब्राहिम तिच्या प्रेग्नंसीच्या बातमीमुळे चर्चेत आहे. तिनं युट्यूबवर एक व्लॉग शेअर करत तिच्या प्रेग्नंसीला सहा आठवडे झाल्याचे म्हटले होते. पण तिची सतत ब्लीडिंग होत होती. डॉक्टरांनी देखील सांगितलं होतं की हा काळ तिच्यासाठी खूप कठीण आहे. या काळात तिनं स्वत: ची खूप काळजी घेतली पाहिजे. दरम्यान, सबानं नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये तिच्या मिसकॅरेजविषयी सांगितले आहे. तिचा पती सनीनं या सगळ्याची टाइमलाइन देखील सांगितली आहे.
खरंतर गेल्या काही दिवसांपासून सबाची तब्येत ठीक नव्हती आणि तिला काही हेल्थ प्रॉबलम होऊ लागले होते. पीसीओडीमुळे तिला प्रेग्नंसीमध्ये अनेक गोष्टींचा सामना करावा लागत होता. तिच्या बाळाची हार्ट रेट नॉर्मल नव्हती आणि तिला सतत ब्लीडिंगही सुरु होती. त्यामुळे डॉक्टरांनी तिला 15 दिवसाता प्रॉपर बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला होता. ज्यात ती फक्त वॉशरुमला जाण्यासाठी बेडवरून उठ शकत होती. त्यानंतर 8 मे रोजी डॉक्टरांकडे गेले तर त्यांना अबॉर्शन करण्यास सांगितले कारण बाळाची हार्टबीट नव्हती. सबाच्या पतीनं सांगितलं की तो बाहेर बसला होता आणि सबा स्कॅन करण्यासाठी गेली होती. त्यावेळी सगळं ठीक होईल याची अपेक्षा ते दोघं करत होते. पण जेव्हा त्यांना कळलं की त्यांच्या बाळाची हार्ट बीट नाही आहे, तेव्हा त्यांना ऐकूण धक्का बसला. त्यानंतर डॉक्टरांची भेट घेतली आणि संपूर्ण बातमी कुटुंबाला दिली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता बोलावलं. त्यानंतर सबाचं ऑपरशेन झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की सबा आता ठीक आहे. ही आमच्या आयुष्यातील धक्कादायक घटना होती.
हेही वाचा : Parineeti Chopra च्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा दिल्लीत दाखल
सबा यावेळी म्हणाली बऱ्याच लोकांसोबत हे होतं. अनेकांची मोठी मुलं अल्लाह घेऊन जाको. तर ते कसं स्वत: ला सांभाळतात. असं अनेकांसोबत झालं आहे आणि त्यांच्यापैकी मी एक आहे. हे सगळं अल्लाहच्या मर्जीनं झालं आहे. त्यांनी कोणत्यातरी गोष्टीचा विचार केला असेलच. पण त्यांनी आपल्यासाठी अजून असं काय विचार केला असेल हे आपल्याला माहित नाही. अल्लाहच्या मर्जीवर विश्वास ठेवत आनंदी राहिलं पाहिजे. सबा आणि सनीचं गेल्या वर्षी 2022 साली विवाह झाला. त्याचं लग्न गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर 2022 साली झालं होतं.