close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

धक्कादायक! रुग्णवाहिकेअभावी प्रसूतीनंतरच अभिनेत्रीचा मृत्यू

कुटुंबावर दु:खाचा डोंगर 

Updated: Oct 21, 2019, 11:39 PM IST
धक्कादायक! रुग्णवाहिकेअभावी प्रसूतीनंतरच अभिनेत्रीचा मृत्यू

मुंबई :  ‘फाल्गुनराव जिंदाबाद’, ‘देवी माऊली आम्हा पावली’ या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारणाऱ्या प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या २५ वर्षीय अभिनेत्रीवर काळाने घाला घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून गरोदर असल्यामुळे चित्रपटसृष्टीपासून दूर असणाऱ्या पूजा झुंजार नामक अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. तिच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांना धक्काच बसला आहे. 

माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार मुळच्या हिंगोलीतील सेनेगाव या गावच्या असणाऱ्या पूजा यांच्या जीवनात लागलेल्या मातृत्वाच्या या वळणामुळे आनंदाचं वातावरण होतं. प्रसूती कळा सुरु झाल्यामुळे त्यांना प्राथमिक स्तरावर आरोग्य केंद्रात दाखलही करण्यात आलं. पण, काही महत्त्वाच्या सुविधांअभावी आई आणि बाळ दोघांचाही मृत्यू झाला. 

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पूजा यांच्यावर हा प्रसंग ओढावल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्रसूती झाली. पण, त्यानंतरच्या काही क्षणांतच त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. पुढे पूजा यांचीही प्रकृती खालावत गेली. परिणामी त्यांना हिंगोलीतील रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला. पण, तेथे नेण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्यामुळे वाहनाची व्यवस्था करण्यातच फार वेळ दवडला गेला. रुग्णवाहिका मिळताच पूजा यांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची घाई केली गेली, पण तोवर फार उशीर झाला होता.