या अभिनेत्रीने अवघ्या 60 सेकंदात नेसली साडी

कोण आहे ही अभिनेत्री 

या अभिनेत्रीने अवघ्या 60 सेकंदात नेसली साडी title=

मुंबई : साडी नेसणं ही प्रत्येक महिलेसाठी मोठी गोष्ट आहे. काहींना साडी नेसायला आवडत असली तरीही त्यांना साडी नेसता येत नाही. कारण साडी नेसणं एक दिव्यच असतं. कारण साडी नेसायला खूप वेळ देखील लागतो. आणि नेसलेली साडी सांभाळण हे देखील एक कठीण काम आहे. कारण साडी नेसण्यासाठी नाही म्हटलं तरी 15 ते 20 मिनिटे लागतात. मात्र एका अभिनेत्रीने चक्क ही साडी अवघ्या 60 सेकंदात नेसली आहे. 

46 वर्षीय अभिनेत्री मंदिरा बेदीने मंगळवारी दुपारी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या व्हिडिओत मंदिरा अगदी शानदार पद्धतीने साडी नेसताना दिसत आहे. मंदिराने कुणाचीही मदत न घेता 1 मिनिटाच्या आतच ही साडी नेसली आहे. यावर मंदिरा म्हणते की, महिला साडी नेसायला वेळ लागतो म्हणून नेसणं टाळतात. मात्र मी ही साडी अवघ्या 60 सेकंदात नेसली आहे. या व्हिडिओला अधिक लोकांनी पसंत केलं आहे. 

1994 साली मंदिरा बेदीची 'शांती' ही मालिका अतिशय लोकप्रिय झाली होती. आजही मंदिरा बेदीला लोकं शांती या नावाने ओळखतात. तसेच DDLJ या सिनेमात देखील तिने काम केलं होतं. 1999 साली मंदिरा बेदीने राज कौशलशी लग्न केलं आहे.