धक्कादायक : अनेक वर्षांनंतर दिव्या भारतीच्या मृत्यूचं सत्य समोर; सहकलाकाराचा मोठा खुलासा

दिवगंत अभिनेत्री दीव्या भारती टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. बाल्कनीतून पडून अभिनेत्रीचा मृत्यू झाला होता. ती बाल्कनीतून कशी पडली, तिचा मृत्यू कसा झाला याचं रहस्य अद्याप समोर आलेलं नाही. मात्र अनेक वर्षांनंतर बॉलिवूड अभिनेत्याने याप्रकरणी धक्कादायक खुलासा केला आहे.

Updated: Apr 13, 2024, 08:03 PM IST
धक्कादायक : अनेक वर्षांनंतर दिव्या भारतीच्या मृत्यूचं सत्य समोर; सहकलाकाराचा मोठा खुलासा title=

मुंबई : दिवगंत अभिनेत्री दीव्या भारती ही कोणाला माहिती नाही. ही अभिनेत्री अशी होती जिचा चाहता वर्ग ती या जगात नसातानाही आहे. त्यावेळची ही अभिनेत्री टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. दिव्या भारतीने अगदी लहान वयात या जगाचा निरोप घेतला. तिच्या जाण्याने केवळ सिनेसृष्टीतच नव्हेतर तिच्या चाहत्यावर्गामध्ये देखील खळबळ माजली होती. बाल्कनीतून पडून अभिनेत्रीचा मृत्यू झाला होता. ती बाल्कनीतून कशी पडली, तिचा मृत्यू कसा झाला याचं रहस्य अद्याप समोर आलेलं नाही. मात्र अनेक वर्षांनंतर बॉलिवूड अभिनेता कमल सदानाने याप्रकरणी धक्कादायक खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या सिद्धार्थ कन्ननला मुलाखतीत त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. 

दिलेल्या मुलाखतीत कमल सदना म्हणाले, 'ते दिवस खूप कठीण होते. खरंच खूप वाईट वाटतं. ती त्या काळातील सर्वोत्कृष्ट नायिकांपैकी एक होती. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप भारी होता. तिच्यासोबत काम  करताना खूप मजा यायची. दिव्या भारतीमध्ये श्रीदेवीची नक्कल करण्याचं धाडस होतं. मी तिला नेहमी सांगायचो, 'तू सार्वजनिकपणे असं करू नकोस. ती खूप कमाल होती. पण नंतर दिव्या आपल्यात नाही ही आमच्यासाठी धक्कादायक बातमी होती. मी नुकतंच तिच्यासोबत शूटिंग पूर्ण केलं.  पण जेव्हा मला हे समजलं तेव्हा असा विचार आला की, हे अशक्य आहे? जाण्याचा हा नैसर्गिक मार्ग नाही.' 

पढे कमल सदाना म्हणाले, त्यावेळी दिव्याकडे खूप सिनेमा होते. ती आता असती तर तेव्हाची ती सुपस्टार झाली असती. मला माहितीये की, ज्यावेळी तिचा मृत्यू झाला तेव्हा तिने काही ड्रिंग्स घेतली होती आणि तिला स्वत:लाही सावरता येत नव्हतं. मला वाटतं की ती नशेत होती आणि  त्यामुळेच तिचा तोल गेला.  माझ्यामते तो एक अपघात होता. या घटनेआधी मी तिच्यासोबत शूटींग करत होतो. तेव्हा ती ठीक होती. तिला कशाचीच अडचण नव्हती. तिच्याकडे एकापेक्षा एक खूप सिनेमा होते. याचबरोबर असे अनेक निर्माते तिला तिच्या सिनेमात कास्ट करु इच्छित होते.'' असं कमल सदाना यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.