मॉडेलकडून पार्टीचं सत्य उघड; अनेक तास विवस्त्र, चारही बाजूंना सुरु होता सेक्स आणि...

अनेक जोड्या इंटिमेट होताना दिसत होत्या. 

Updated: Nov 12, 2021, 05:35 PM IST

मुंबई : एखादी पार्टी म्हटलं की, काही गोष्टी आपल्या नजरेसमोर आपोआपच उभ्या राहतात. पण, याला अपवाद ठरणारी अशी एक पार्टी सर्वांच्याच भुवया उंचावत आहे. याचा खुलासा अमेरिकन मॉडेलकडून करण्यात आला आहे. 

प्लेबॉय मेंशनमध्ये होणाऱ्या हॅलोविन पार्टीला खुलासा आणि त्यामागील सत्य या मॉडेलनं उघड केलं आहे. 

तिच्यामते एका पार्टीमध्ये तिला अनेक तास विवस्त्र उभं राहावं लागलं होतं. तिथं असणाऱ्या अनेक जोड्या इंटिमेट होताना दिसत होत्या. 

तिथं जे काही घडलं हे त्या मॉडेलच्या सहमतीनं होत होतं. कारण, प्लेबॉयच्या संसंथापकांचा प्रस्ताव ती नाकारू शकत नव्हती. 

32 वर्षीय जेना बेंटले (Jenna Bentley) हिला तिच्या बॉयफ्रेंडनं प्लेबॉयचे संस्थापक ह्यू हेफनर (Hugh Hefner) यांच्याशी त्यांच्यात पार्टीमध्ये भेटवलं होतं. त्यावेळी जेनाचं वय अवघी 18 वर्षे इतकं होतं. 

'जेव्हा आम्ही पार्टीला पोहोचलो तेव्हा मी माझ्या शरीरावर चित्र काढून घेऊ इच्छिते का असं हेफनर यांनी मला विचारलं. मी त्यासाठीतयार झाले. ज्यानंतर मला कमीत कमी चार तास विवस्त्र रहावं लागलं होतं. पेंट झाल्यानंतर कपडे घालण्याचा काहीच अर्थ नव्हता', असं ती म्हणाली. 

जेनानं दिलेल्या माहितीनुसार त्या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींची हजेरी होती. कशाचीही तमा न बाळगता ते शारीरिक संबंधांचा आनंद घेत होते. पार्टीतील प्रत्येक व्यक्ती आपल्याच धुंदीत होता. 

आपणही त्या पार्टीमध्ये धमाल केल्याचं सांगत, आपल्याला महिलाही आवडतात हे त्या पार्टीमध्येच कळलं होतं असंही ती म्हणाली. 

पार्टी में कई Celebrities भी थे मौजूद

पार्टीतील आपल्या अनुभवाचं कथन करताना जेनानं सांगितलं, 'माझ्या शरीरावर एकही वस्त्र नव्हतं. पेंट कॉस्च्युम इतक्या बारकाव्यानं साकारण्यात आलं होतं. ज्यामध्ये लहानलहान दागिनेही रंगवण्यात आले होते. मी याच चिंतेत होते की हा रंग काढल्यानंतर काय होईल? पण तिथे सर्व अगदी परफेक्ट होतं.'

'किसी का नाम नहीं बता सकती'

जेना ज्या पार्टीमध्ये गेली होती, तिथेच ती मुलींकडेही आकर्षित होत होती. पण, या पार्टीबाबत तिनं घरी काहीही सांगितलं नव्हतं.