नेताजींवर आधारित 'गुमनामी' पुन्हा चर्चेत...

श्रीजीत मुखर्जी 'गुमनामी'चं दिग्दर्शन करत आहेत.

Updated: May 29, 2019, 10:49 AM IST
नेताजींवर आधारित 'गुमनामी' पुन्हा चर्चेत...  title=

मुंबई : 'गुमनामी' चित्रपटाचं शूटिंग मंगळवारपासून पंश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये सुरु करण्यात आलं आहे. हा चित्रपट 'गुमनामी बाबा' या रहस्यमय व्यक्तीवर आधारित आहे. 'गुमनामी बाबा' म्हणजेच स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्र बोस असल्याचीही अनेकांची धारणा आहे. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी 'गुमनामी' चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. सुप्रसिद्ध अभिनेता प्रोसेनजीत चटर्जी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 'आम्ही चित्रपटाचं चित्रीकरण सुरु केलं' असल्याचं ट्विट करत चित्रपटासाठी महाकालचे आर्शिवाद मागितले असल्याचं त्यांनी म्हटलंय.

बॉलिवुड गायक आणि आता राजकीय नेते बनलेले बाबुल सुप्रियोदेखील 'गुमनामी' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचं श्रीजीत मुखर्जीने म्हटलं आहे. 

'गुमनामी' चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर दिवंगत नेताजी यांचे पुत्र चंद्र कुमार बोस यांनी सांगितलं की, कोणत्याही कागदपत्रांशिवाय किंवा कोणत्याही फोटोच्या पुराव्याशिवाय नेताजी यांनी 'गुमनामी बाबा' बोलणं हा गुन्हा आहे. 

नेताजी यांच्या कुटुंबियांनी केलेल्या विरोधामुळे 'गुमनामी' चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं. मात्र आता पुन्हा चित्रपटाचं शूटिंग सुरु करण्यात आलं आहे. येत्या नवरात्री दरम्यान चित्रपट प्रदर्शित होणार आहे.