मुंबई : सत्यमेव जयते सिनेमातील नोरा फतेही ने 20 वर्षांनंतर सुष्मीता सेनच्या दिलबर-दिलबर गाण्यावर डान्स करत धम्माल उडवून दिली. आता सुष्मिता पुन्हा एकदा आपल्याच गाण्यावर थिरकली आहे. सुष्मिताने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केलायं. व्हिडिओमध्ये सुष्मिता दिलबर गाण्यावर रिमिक्स बॅली डान्स करताना दिसत आहे. वर्कआऊट केल्यानंतर तिने हा व्हिडिओ केल्याने तिचे एब्सही ठळकपणे दिसत आहेत.
दिलबर नेहमीच एक खास अनुभव राहिलायं. 20 वर्षांपूर्वी नव्वदीच्या दशकात जेव्हा हे गाणं आलं होतं तेव्हा लोक सुष्मिताचे डाय हार्ट फॅन झाले होते. सुष्मिता आणि संजय कपूर यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. अलका याग्निक आणि विनोद राठोडने या गाण्याला आवाज दिला होता.
दिलबरच्या रिमिक्स वर्जनमध्ये नोरा फतेहीचे डान्स मूव्ह आवडल्याचे सुष्मिताने सांगितले. लॅक्मे फॅशन वीकमध्ये सुष्मिताला नोराबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी नोराने या गाण्यात खूप चांगल काम केल्याचं तिनं यावेळी सांगितलं. पण मला आजही गाण्याचं जुनं वर्जनंच आवडत असल्याचं ती सांगते.
सुष्मिता सेन बॉलीवुडमध्ये वापसी करण्याच्या तयारीत आहे. लवकरच ती आपल्या नव्या सिनेमाच्या नावाची घोषणा करणार आहे.यामध्ये ती पोलीस अधिकाऱ्याच्या कॅरेक्टरमध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती मुख्य भूमिकेत असून याची शूटींग वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होऊ शकते.