श्रद्धाने केलेल्या डान्सची चर्चा तर होणारच, तुम्ही श्रद्धाचा हा डान्स पाहिलात का?

बॉलिवूडची सुंदर आणि गुणी अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सध्या मालदीवमध्ये आहे. यावेळी अभिनेत्रीने आपला वाढदिवस मालदीवमध्ये

Updated: Mar 3, 2021, 11:29 PM IST
श्रद्धाने केलेल्या डान्सची चर्चा तर होणारच, तुम्ही श्रद्धाचा हा डान्स पाहिलात का?

मुंबई : बॉलिवूडची सुंदर आणि गुणी अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सध्या मालदीवमध्ये आहे. यावेळी अभिनेत्रीने आपला वाढदिवस मालदीवमध्ये आपल्या फॅमिलीसोबत साजरा केला. श्रद्धाने आपला 34 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. श्रद्धाने तिचा सिनेमा 'स्त्री'मधील कमरिया गाण्यावर कमरियाचा गाण्यावर ठेका धरला. भाऊ प्रियांकच्या लग्नाशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतानाचं. श्रद्धाचे वाढदिवसाचे व्हिडिओ आणि फोटोंनी सोशल मीडियावर धूमाकुळ घातलाय.

तिच्या अभिनयासोबतच तिच्या गाण्याने आणि डान्सनंदेखील चाहत्यांची श्रद्धाने मने जिंकली आहेत. आशिकी 2, हैदर सारख्या चित्रपटानंतर श्रद्धाने 'एक विलन'या चित्रपटाद्वारे 'तेरी गलियॉ' या गाण्याद्वारे गाण्याला सुरुवात केली.त्याचवेळी 'एबीसीडी' या सिनेमातून तिने तिच केलेले जबरदस्त डान्स करून सगळ्यांचं बोलती बंद केली. 

त्याचवेळी, स्ट्रीट डान्सरमध्ये श्रद्धा बेली डान्सर नोरा फतेहीसोबत बिंग डान्स करताना दिसली. श्रद्धा सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टिव असते. मात्र ईतर अभिनेत्रींप्रमाणे ती पोस्ट खूप कमी प्रमाणात शेअर करते.

श्रद्धाची सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे आणि ती इन्स्टाग्रामवर ५० कोटी ओलांडणारी बॉलिवूडची दुसरी अभिनेत्री ठरली आहे. याक्षणी श्रद्धा तिच्या लव्ह लाईफबद्दल कायम चर्चेत असते. नुकतीच ती चुलत भाऊ प्रियांक शर्माच्या लग्नात श्रद्धा तिचा प्रियकर रोहन श्रेष्ठसोबत दिसली होती.

वरुण धवनच्या लग्नानंतर श्रद्धा कपूर कधी लग्न करणार याकडे सगळ्यांच्याचं नजरा लागल्या आहेत. वरुण-श्रद्धा हे बालपणीचे मित्र-मैत्रिण आहेत. अगदी ऐकेकाळी वरुण श्रद्धाची क्रश होती, ज्याचा उल्लेख वरुणने स्वतः एका मुलाखतीत केला होता.श्रद्धा कपूर सध्या रणबीर कपूरसोबत लव्ह रंजन या आगामी चित्रपटात दिसणार आहे.