पुणे : प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर देखील आज महाश्रमदानात सहभागी झाली. सईनं पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सकाळवाडी इथं श्रमदान केलं. पाणी फाऊंडेशनच्या या उपक्रमाला पुणे जिल्ह्यात उदंड प्रतिसाद मिळत आहे. पुरंदर हा जिल्ह्यातील दुष्काळी तालुका मानला जातो. त्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आज हजारो हात पुढे आले आहेत.
पुरंदरमध्ये अनेक ठिकाणी श्रमदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिनेता गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांसह सिने क्षेत्रातील अनेक कलावंत त्यात सहभागी झाले होते. अभिनेत्री सई ताम्हणकरनं यावेळी ग्रामस्थांशी संवादही साधला.
.@SaieTamhankar registering herself for the much awaited #Shramdaan activity organised by the @paanifoundation. #MaharashtraDay #LabourDay #PaaniFoundation #SaiTamhankar @aamir_khan @satyamevjayate pic.twitter.com/ueHoVJPY8c
— Dreamers PR (@DreamersPR) May 1, 2018
दरम्यान, आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आमिर खानच्या पाणी फाऊंडेशननं महाश्रमदानाचं आयोजन केलंय. राज्य पाणीदार करण्यासाठी शहरातल्या जनतेनं गावी जाऊन तीन तास श्रमदान करण्याचं आवाहन आमिरच्या फाऊंडेशन केलंय.
आमीर आणि त्याची पत्नी किरण राव स्वतः लातूरमध्ये सकाळपासून श्रमदानाच्या मोहिमेत उतरले आहे. राज्यात अनेक ठिकाणी महाश्रमदानाला मोठा प्रतिसाद मिळतोय... 'झी २४ तास'देखील प्रेक्षकांना या श्रमदानाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचं तुम्हाला आवाहन करत आहे.