'शुभ मंगल सावधान' सिनेमाचं 'लड्डू' गाणं रिलीज

आयुषमान खुराना आणि भूमि पेडणेकरचा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'शुभ मंगल सावधान' या सिनेमाचं 'लड्डू' हे गाणं रिलीज झालं आहे. दोन हिट गाण्यानंतर 'शुभ मंगल सावधान' च्या लड्डू गाणं रिलीज केलं आहे. मिका सिंहचा आवाज आपल्याला या गाण्यात ऐकायला मिळणार आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 22, 2017, 06:37 PM IST
'शुभ मंगल सावधान' सिनेमाचं 'लड्डू' गाणं रिलीज  title=

मुंबई : आयुषमान खुराना आणि भूमि पेडणेकरचा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'शुभ मंगल सावधान' या सिनेमाचं 'लड्डू' हे गाणं रिलीज झालं आहे. दोन हिट गाण्यानंतर 'शुभ मंगल सावधान' च्या लड्डू गाणं रिलीज केलं आहे. मिका सिंहचा आवाज आपल्याला या गाण्यात ऐकायला मिळणार आहे. 

गेल्या दोन व्हिडिओप्रमाणे यामध्ये ही आयुष्मान आणि भूमीच्या केमेस्ट्रीचा आणखी चांगला उलगडा या गाण्यात होताना दिसत आहे. शुभ मंगल सावधान हा सिनेमा रोमँटिक कॉमेडीमध्ये मोडतो. या सिनेमाचं गाणं सध्या सगळ्यांच्या पसंतीला येत आहे. 

या सिनेमात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुदित आणि सुगंधा यांचा प्रेमापासून ते लग्नापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तमिळ दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित ‘शुभ मंगल सावधान’ सिनेमाची निर्मिती आनंद एल राय यांच्या ‘कलर यल्लो प्रॉडक्शन’अंतर्गत करण्यात आली आहे. बिघडलेले नाते पूर्ववत करण्यासाठी पुन्हा एकत्र आलेल्या पती-पत्नीवर या सिनेमाची कथा आधारित आहे.