श्वेता तिवारीने अनोख्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस, मुलगी पलकला नाही आवडलं, म्हणाली- माझी...

श्वेता तिवारीने तिचा 44 वा वाढदिवस दुबईत मित्रांसोबत साजरा केला. श्वेता तिवारीने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. परंतु, श्वेताची स्टाईल मुलगी पलकला आवडली नाही. काय म्हणाली पलक? वाचा सविस्तर 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 5, 2024, 12:45 PM IST
श्वेता तिवारीने अनोख्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस, मुलगी पलकला नाही आवडलं, म्हणाली- माझी...
Shweta Tiwari Birthday Celebration Photo

Shweta Tiwari Birthday Celebration Photo : अभिनेत्री श्वेता तिवारीने 4 ऑक्टोबर रोजी तिचा 44 वा वाढदिवस मित्रांसोबत दुबईमध्ये साजरा केला आहे. 44 व्या वर्षी देखील श्वेता खूप हॉट आणि सुंदर दिसत आहे. नुकतेच तिने दुबईमधील वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यावर चाहत्यांनी देखील प्रेमाचा आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मात्र, श्वेता तिवारीच्या दुबईमधील सेलिब्रेशनचे फोटोंवर पलक तिवारीने प्रतिक्रिया दिली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. 

काय म्हणाली पलक तिवारी? 

आई श्वेता तिवारीच्या वाढदिवसाचा फोटो पाहून पलक तिवारीने म्हटले की, तिने माझी स्टाईल कॉपी केली आहे. फोटोमध्ये श्वेता व्हाइट टॉप, डेनिम जॅकेट आणि जीन्समध्ये दिसत आहे. श्वेताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती तिच्या मित्रांसोबत वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

श्वेता तिवारीच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक

श्वेता तिवारीचे वाढदिवसाचे सेलिब्रेशन पाहून चाहते देखील तिच्या फोटोंवर आणि व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यासोबत चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 44 व्या वर्षी देखील श्वेता 25 वर्षांच्या मुलीसारखी दिसते. हे पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. तिच्या सौंदर्याचे देखील चाहते कौतुक करताना दिसत आहेत. काही चाहत्यांनी तिला 44 वर्षांची नाही तर तू 25 वर्षांची आहे. अशा कमेंट्स तिच्या व्हिडीओवर करत आहेत. तर काही चाहत्यांनी म्हटलं आहे की, श्वेताचे वय वाढण्याऐवजी कमी होत चालले आहे. 

सोशल मीडियावर लाखो चाहते

अभिनेत्री श्वेता तिवारीचे सोशल मीडियावर देखील प्रचंड चाहता वर्ग आहे. श्वेता नेहमी चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. ती नेहमी तिच्या हॉट आणि बोल्ड लुकने चाहत्यांमध्ये चर्चेत असते. सध्या श्वेता तिवारी अभिनयापासून दूर असली तर ती तिच्या सौंदर्याने खूप चर्चेत आहे. अभिनेत्रीला मालिकेतून प्रसिद्धी मिळाली आहे. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More