'स्वप्नपूर्ती...', Siddharth Jadhav चे आई-वडिलांसाठी आयुष्यातील खास सरप्राईज

Siddharth Jadhav नं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्याची पोस्ट पाहून नेटकरी आणि सेलिब्रिटी त्याचे कौतुक करत आहेत. 

Updated: Feb 5, 2023, 07:12 PM IST
'स्वप्नपूर्ती...', Siddharth Jadhav चे आई-वडिलांसाठी आयुष्यातील खास सरप्राईज title=

Siddharth Jadhav Post On New House : अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth jadhav) हा फक्त आता मराठी चित्रपटसृष्टीतला कलाकार नाही तर बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही तो तितकाच सक्रिय आहे. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतंच सिद्धार्थनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याचं एक स्वप्न पूर्ण झाल्याचा खुलासा केला आहे. त्यानं दिलेल्या या आनंदाच्या बातमीनं चाहत्यांना मात्र, प्रचंड आनंद झाला आहे. 

सिद्धार्थनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थन त्यानं त्याच्या आई-वडिलांना घर घेऊन दिल्याचा खुलासा केला आहे. सिद्धार्थनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थनं एका नेम प्लेटचा फोटो शेअर केला आहे. या नेम प्लेटवर आई मंदाकिनी रामचंद्र जाधव आणि वडील रामचंद्र भागोजी जाधव यांची नावं आहेत. ही पोस्ट शेअर करत सिद्धार्थनं कॅप्शन दिलं की 'स्वप्नपूर्ती…. #आईबाबा. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि आनंदाचा क्षण. स्वप्नपूर्तीचा तो क्षण.' (Siddharth jadhav Instagram Post) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिद्धार्थनं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोवर कमेंट करत सिद्धार्थचे चाहते आणि अनेक कलाकार त्याची स्तुती करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की अभिनंदन सर तुमचे. दुसरा नेटकरी म्हणाला की व्वा सिद्धू. तिसरा नेटकरी म्हणाला, गो बॉय. तर अभिनेत्री क्रांती रेडकरनं कमेंट केली की वाह सिद्धू, भावा. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी सिद्धार्थचं कौतुक केले आहे. 

हेही वाचा : Priyanka Chopra नंतर 'या' सेलिब्रिटी कपलनं दाखवला मुलीचा चेहरा

सिद्धार्थ हा एक सर्वसामान्य कुटुंबातून आहे. त्यात सिद्धार्थचे बॅकग्राऊंड हे चित्रपटसृष्टीशी संबंधीत नाही. सिद्धार्थन अभिनेता म्हणून करिअरच्या सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल केलं. त्याला अनेकांनी काहीही काही सांगितले मात्र, त्यानं हार मानली नाही आणि तो आज लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. इतकंच काय तर सिद्धार्थ हा आज फक्त मराठी नाही तर बॉलिवूड चित्रपटसृष्टीत देखील सक्रिय आहे. 

सिद्धार्थच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो ‘तमाशा लाईव्ह’, ‘दे धक्का २’ या मराठी चित्रपटांमध्ये दिसला होता. तर सर्कस आणि सिम्बा या हिंदी चित्रपटांमध्ये दिसला होता. सिद्धार्थला या चारही चित्रपटांतून प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.