कियारा-सिद्धार्थचं ब्रेकअप? छे!!!.फक्त अफवांचा बाजार...पार्टीत पुन्हा दिसले एकत्र

सिद्धार्थ आणि कियारा, ज्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत.पण एकत्र येऊन या दोघांनी त्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला.

Updated: May 4, 2022, 09:21 AM IST
कियारा-सिद्धार्थचं ब्रेकअप? छे!!!.फक्त अफवांचा बाजार...पार्टीत पुन्हा दिसले एकत्र title=

मुंबईः नुकतेच अर्पिता आणि आयुषच्या घरी झालेल्या ईद पार्टीत कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा​स्पॉट झाले होते.यादरम्यान या जोडप्याने त्यांच्या ब्रेकअपची प्रत्येक अफवा खोटी ठरविली. सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या ईद पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 

या पार्टीत अनेकांची अप्रतिम केमिस्ट्रीही पाहायला मिळाली आणि यापैकी एक म्हणजे सिद्धार्थ आणि कियारा, ज्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत.पण एकत्र येऊन या दोघांनी त्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कियारा अडवाणीने पार्टीत इंडो-वेस्टर्न आउटफिट घातला होता, ज्यामध्ये ती अप्रतिम दिसत होती. कियाराने थ्री-पीस को-ऑर्ड सेट घातलेला दिसला.  पांढऱ्या क्रॉप टॉपसह जुळणारी ट्राउझर्स तिने परिधान केली होती आणि वरून श्रगही घातला होता.

अभिनेत्रीने तिचे केस मोकळे सोडले होते. कियाराने कार्यक्रमासाठी तिचा मेकअप ग्लॅमरस आणि फ्रेश लूक कायम ठेवला आणि व्हाईट चोकरसह लूक पूर्ण केला. त्याचवेळी सिद्धार्थ मल्होत्रानेही खूप फॅशनेबल कपडे परिधान केले होते. 'शेरशाह' अभिनेत्याने पांढरा नक्षीकाम असलेला स्टायलिश काळा कुर्ता परिधान केला होता.

सिद्धार्थ मल्होत्राचे 'मिशन मजनू', 'थँक गॉड', 'योधा' आणि 'इंडियन एअर फोर्स' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कियारा अडवाणीबद्दल सांगायचे तर कियारा ही 'जग जुग जिओ', 'गोविंदा नाम मेरा' आणि 'भूल भुलैया 2' मध्ये दिसणार आहे. 'भूल भुलैया 2' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.