मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मिशन मजनू' सिनेमाचं शूटिंग सध्या सुरू आहे. या सिनेमाविषयी देखील बरीच चर्चा सातत्याने समोर येत आहे. हा सिनेमा १९७० साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. सिनेमाचं शूटिंग सध्या लखनऊमध्ये सुरू आहे आणि शूटिंगसाठी सिद्धार्थ मल्होत्रा लखनऊमध्ये आहे. दरम्यान, सेटवर सिद्धार्थ मल्होत्रा जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे.
सिद्धार्थला सेटवर दुखापत झाली
एका वृत्तानुसार या सिनेमात बरेच अॅक्शन सीक्वेन्स आहेत. मिशनवर आधारित असलेल्या सिनेमात सिद्धार्थ अंडर-कव्हर ऑपरेटिव्हच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं अॅक्शन सीन्स करताना सिद्धार्थ मल्होत्रा सेटवर जखमी झाला आहे. जखमी झाल्यानंतरही सिद्धार्थने आपले सीन पूर्ण केले असल्याचही म्हटलं जात आहे.
दुखापतीनंतरही सिद्धार्थ थांबला नाही
एका वृत्तानुसार सिद्धार्थ 'मिशन मजनू' या सिनेमाचे जम्प अॅक्शन सीक्वेन्सचं शूट करत होता. हे शूट करत असताना सिद्धार्थच्या पायाला लोखंडाचा तुकडा लागला आणि त्याला दुखापत झाली. अशा परिस्थितीत शूटिंग थांबवण्याऐवजी सिद्धार्थनं सेटवर उपचार घेतले आणि आपलं शूटिंग पूर्ण केलं. अहवालानुसार, सिद्धार्थच्या गुडघ्याला दुखापत झाली तरीदेखील, पुढचे 3 दिवस शूटिंग चालू होती आणि आणि दूखापती दरम्यानदेखील सिद्धार्थने शूटिंग पूर्ण केले.
'मिशन मजनू' हा सिनेमा पाकिस्तानमध्ये झालेलं भारतातील सर्वात मोठ्या मिशनची कथा आहे. एक असं मिशन ज्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा रॉच्या एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शंतनू बागची करीत आहेत. या सिनेमात सिद्धार्थसोबत दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.