'कृष्णा माझा कोणी...', गोविंदानं भाच्याला मिठी मारताच सुनीताची संतप्त प्रतिक्रिया

Govinda-Krushna Abhishek : गोविंदानं भाच्याशी असलेले मतभेद संपवल्यानंतर सुनीता आहुजानं दिली संतप्त प्रतिक्रिया...

दिक्षा पाटील | Updated: Jan 6, 2025, 02:17 PM IST
'कृष्णा माझा कोणी...', गोविंदानं भाच्याला मिठी मारताच सुनीताची संतप्त प्रतिक्रिया title=
(Photo Credit : Social Media)

Govinda-Krushna Abhishek : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि भाचा कृष्णा अभिषेकनं त्यांच्यात असलेला सात वर्षांचा दुरावा हा संपवला आहे. दोघं काही दिवसांपूर्वीच द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये दिसले. त्यावेळी ते दोघं परफॉर्म करताना दिसले. फक्त इतकंच नाही तर गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती तेव्हा कृष्णा आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह दोघं रुग्णालयात पोहोचले होते. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुनीतानं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

सुनीता नेहमीच हसत खेळत राहते आणि प्रत्येक गोष्टीवर तिला काय वाटतं याविषयी स्पष्ट मत मांडताना दिसते. कृष्णा अभिषेक आणि गोविंदामध्ये पुन्हा सगळं आधीसारखं झालं आहे. त्यावर सुनीतानं सांगितलं की 'मी आनंदी आहे. दोन्ही कुटुंब एकत्र आले आहेत. मला कोणाशीच काही घेणं देणं नाही. तो त्याचा भाचा आहे. दोघं मामा-भाचा आहेत. मी कधीच गोविंदाला कृष्णाशी जास्त बोलताना थांबवलं नाही आणि बोलू नकोस असं सांगितलं नाही. दरम्यान, कृष्णाचं माझ्याशी काही नातं नाही. मी आनंदी आहे की गोविंदा आणि कृष्णामधील दुरावा संपला आहे. पण मी त्या दोघांना नेटफ्लिक्सवर नाही पाहिलं. ते गोविंदाचं कुटुंब आहे. तो त्याच्या बहिणीचा मुलगा आहे. मी का काही बोलावं, जे आहे ते त्या दोघांमध्ये आहे. कृष्णा माझा कोणी नाही.'

सुनीता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिनं नुकतीच तिची मुलगी टीना अहूजासोबत एका मुलाखतीक दिसली होती. ज्यात सांगितलं की टीनाला इंडस्ट्रीमध्ये काम करायचं होतं, पण कोणीतरी त्यांच्यात किती टॅलेन्ट आहे ते पाहावं तरी. 

हेही वाचा : ए आर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? हिंदू ज्योतिषानं ठेवलं मुस्लिम नाव

दरम्यान गोविंदा जेव्हा शोमध्ये दिसला तेव्हा चंकी पांडे आणि शक्ति कपूर देखील त्याच्यासोबत दिसले. सोशल मीडियावर कपिल शोच्या एपिसोडची चांगलीच चर्चा रंगली होती. गोविंदानं त्यात कृष्णा अभिषेकसोबत परफॉर्म केलं होतं. त्यांच्या या एपिसोडमधील अनेक क्लिप्स या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यात सगळ्यात जास्त चर्चा ही गोविंदा आणि कृष्णा अभिषेकच्या डान्सची होती.