Sidharth Shukla Death: ऑडिशनच्या वेळी असा दिसायचा सिद्धार्थ; VIDEO व्हायरल

सिद्धार्थ आज आपल्यातून गेला असला तरीही.... 

Updated: Sep 2, 2021, 04:42 PM IST
Sidharth Shukla Death: ऑडिशनच्या वेळी असा दिसायचा सिद्धार्थ; VIDEO व्हायरल  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

Sidharth Shukla Death: अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यानं वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून तसंच रिअॅलिटी शोच्या माध्यमातून हा चेहरा घराघरात पोहोचला होता. पण, आता मात्र फक्त सिद्धार्थच्या आठवणीच सोबत राहिल्या आहेत. 

मुंबीईतील कूपर रुग्णालयाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थला गुरुवारी सकाळी 9.25 वाजण्याच्या सुमारास रुग्णालात आणलं गेलं, तेव्हाच त्याची प्राणज्योत मालवली होती. 

Sidharth Shukla Death: सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर मोठा प्रश्न; कमी वयात का येतो Heart Attack ?

 

सिद्धार्थ आज आपल्यातून गेला असला तरीही त्याच्या आठवणी आणि असंख्य परफॉर्मन्सच्या माध्यमातून तो आजही आपल्यात आहे, अशाच भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. सिद्धार्थ हा त्याचं दमदार व्यक्तीमत्त्वं, भारदस्त आवाज आणि संवादकौशल्यासाठी विशेष ओळखला जात होता. 'बालिका वधू' या मालिकेनं त्याला विशेष ओळख दिली. तर, 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटामुळं तो रुपेरी पडद्यावरही पोहोचला. (SIDHARTH SHUKLA AUDITION VIDEO)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by  (@badshah_of_my_world)

रुपेरी पडदा आणि छोटा पडदा गाजवणाऱ्या या अभिनेत्याच्या एका ऑडिशनचा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ साधारण वर्षभरापूर्वीच शेअर करण्यात आला होता. जो आता सिद्धार्थच्या निधनानंतर ट्रेंडमध्ये आला आहे. इथं सिद्धार्थ त्याच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसत असून, त्याचा लूकही फार वेगळा आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून या माध्यमातून चाहते त्याला श्रद्धांजली देत आहेत.