VIDEO : आदित्य नारायणकडून एअरलाईन अधिका-याला धमकी

गायक उदीत नारायण यांचा मुलगा गायक आदित्य नारायण याने एका एअरलाईनच्या अधिका-यासोबत केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत आदित्य नारायण इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचा-याला धमकी देताना दिसतो आहे.

Updated: Oct 2, 2017, 03:40 PM IST
VIDEO : आदित्य नारायणकडून एअरलाईन अधिका-याला धमकी title=

रायपूर​ : गायक उदीत नारायण यांचा मुलगा गायक आदित्य नारायण याने एका एअरलाईनच्या अधिका-यासोबत केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत आदित्य नारायण इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचा-याला धमकी देताना दिसतो आहे.

हा व्हिडिओ रायपूर एअरपोर्टचा असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रायपूर एअरपोर्टवर नियोजीत वजनापेक्षा जास्त लगेज नेल्याने त्याची अधिका-यासोबत बाचाबाची झाली. आदित्य हा १७ किलोपेक्षा जास्त लगेज घेऊन जात होता. अधिका-याने त्याला हटकले असता आदित्य चांगलाच संतापला. ‘तू कधी ना कधी मुंबईत येणारच ना, मग तुला बघतो’ असे आदित्य त्या अधिका-याला म्हणाला. 

आदित्य नारायण हा दसरा उत्सवात एका कार्यक्रमासाठी रायपूरला गेला होता. हा कार्यक्रम करून तो परत मुंबईकडे निघाला होता. अधिका-यांना आदित्यला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. पण आदित्य त्यांचं ऎकण्याऎवजी अधिकच राग व्यक्त करत होता.