मुंबई : कॅनडियन गायक जेकब हॉगार्ड (Jacob Hoggard) याला एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. जेकबविरुद्धच्या खटल्याची सुनावणी करताना येथील न्यायालयाने गायक दोषी असल्याचा निकाल दिला. ही बातमी समोर आल्यानंतर जेकबच्या चाहत्यांना जबर धक्का बसला.
एका महिलेने 37 वर्षीय जेकबवर अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आणि बलात्कार केल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. जेकबवर दोन महिलांनी सदरील आरोप केले.
पहिल्या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप असतानाही गायक दोषी आढळला नाही. पण, परंतु दुसऱ्या प्रकरणात मात्र तो दोषी आढळला.
ओटावा येथील एका महिलेने जेकबवर 2016 मध्ये ती 15 वर्षांची असताना तिला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केला. त्यानंतर 2017 मध्ये जेव्हा ती 16 वर्षांची झाली तेव्हा टोरंटोमधील हॉटेलमध्ये जेकबने तिच्यावर बलात्कार केला.
घडल्या प्रकरणाबाबत वाच्छता करु नये म्हणून गायकाने गळा दाबला असल्याचं देखील पीडितेने न्यायालयाला सांगितलं. सध्या बलात्कार प्रकरणी जेकब हॉगार्ड बराच चर्चेत आहे.
जेकबवर दोन महिलांनी केले आरोप
दुसऱ्या एका महिलेने सांगितले की, 2016 मध्ये जेकबला एका डेटिंग अॅपद्वारे भेटली होती. भेटीदरम्यान त्याने तिच्यावर बलात्कार केला.
जेकब हॉगार्ड कॅनेडातील प्रसिद्ध गायक आहे. 2004 मध्ये कॅनडा आयडॉलमध्ये तो सहभागी झाला होता. यात तो विजेता ठरला नाही, मात्र तिसऱ्या क्रमांकावर येऊन त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.