मुंबई : काही कलाकार हे सातत्यानं प्रसिद्धीझोतात नसले, तरीही त्यांनी सादर केलेली कला मात्र वर्षानुवर्षे त्यांची छाप चाहत्यांच्या मनावर सोडत असते. अशाच कलाकारांमधील एक नाव म्हणजे अभिनेता लकी अली. 90 चा काळ आपल्या सुरेल आवाजानं गाजवणाऱ्या लकी अली यांनी एकाएकी झगमगाटापासून दूर राहणं पसंत केलं.
अली यांच्यासोबत नेमकं काय घडलं हाच प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला. खुद्द लकी अली यांनीच केलेला खुलासा पाहता नेमकं काय घडलं होतं याचा अंदाज लावता येत आहे.
टी सीरिजसोबत 'कभी ऐसा लगता है' या गीताचं रेकॉर्डिंग लंडनधील सोहो माईक स्टुडिओमध्ये झालं होतं. या अल्बममधील काही गाण्यांचं रेकॉर्डिंग मुंबईत टी सीरिज स्टुओमध्ये झालं.
असलमनं लकी अली यांच्यासोबत हा अल्बम लिहिला. तर त्यातील एक गीत दुसऱ्या गीतकारानं लिहिलं होतं, अशी माहिती अली यांनी दिली.
इथं लपरदेशी गीतकार होत्या सलमा, ज्या मुळच्या क्वेटा येथील होत्या. पण, मूळ मुद्दा असा होता, की त्यावेळी टी सीरिजकडून समीर यांना प्रसिद्धीझोतात आणलं जात होतं.
परिणामी अली यांच्या अल्बममधील गीतांचं श्रेयही समीर यांच्या नावे देण्यात आलं.
भूषण कुमार यांना सदर प्रकरणी प्रश्न विचारताच अल्बम तिथंच थांबवण्यात आला. असलम यांना त्यांच्या गीतांसाठी श्रेय मिळावं यासाठीच लकी अली प्रयत्नांत होते, पण तसं झालं नाही.
लकी अली यांच्यासोबत घडलेल्या या आणि अशा काही प्रसंगांमुळेही त्यांच्या कारकिर्दीवर याचे परिणाम दिसून आले.
2021 या वर्षाच्या सुरुवातीलाच सोशल मीडियावर लकी अली यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत होता. जिथं ते 'ओ सनम' हे अतिशय गाजलेलं गाणं म्हणताना दिसले होते.
लकी अली हे एक असं नाव आहे, ज्यांना आजही प्रेक्षकांचं अमाप प्रेम आणि आदर मिळतो.