प्रसिद्ध गायक सगळ्यांसमोर निवडणार अर्धांगिनी, पण तिला द्यावी लागणार मोठी परीक्षा

त्यासाठी त्याने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे.

Updated: Feb 28, 2022, 02:07 PM IST
  प्रसिद्ध गायक सगळ्यांसमोर निवडणार अर्धांगिनी, पण तिला द्यावी लागणार मोठी परीक्षा title=

मुंबई : बॉलिवूड गायक मिका सिंग वयाच्या 44 व्या वर्षीही सिंगल आहे. पण आतापर्यंत त्याचे नाव अनेक सुंदरींसोबत जोडलं गेलं आहे.

पण आता मिकाला या सर्व चर्चांना पूर्णविराम द्यायचा आहे आणि त्याने ठरवले आहे की तो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्यासाठी त्याने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे.

पण तो आपली वधू  संपुर्ण जगासमोर वधू निवडणार आहे. होय, लवकरच मिकाचा स्वयंवर टीव्हीवर पाहायला मिळणार आहे.

राखी सावंतनंतर आता गायक मिका सिंगही नॅशनल टेलिव्हिजनवर लग्नाचा स्वयंवर करताना दिसणार आहे. याआधी रतन राजपूत आणि मल्लिका शेरावत यांनीही स्वयंवर केले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हा शो मागील शोसारखाच असेल. काही महिन्यांत हा शो सुरू होईल. मिका सिंग या शोमध्ये लग्न करणार नाही, तो तिथेच एंगेजमेंट करेल आणि तिथून रिलेशनशिप पुढे नेणार असल्याचं बोललं जात आहे.

मिका सिंगच्या स्वयंवरबाबत आणखी काही गोष्टी समोर आल्या आहेत. मिका सिंग यात सहभागी होण्यासाठी खूप उत्सुक आहे. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक भारताच्या वेगवेगळ्या भागातून येणार आहेत.

याआधीही या शोबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. यामागील कारण म्हणजे रतन राजपूत, राखी सावंत किंवा मल्लिका शेरावत यापैकी कोणीही त्यांच्या जोडीदाराशी लग्न केले नाही. राहुल महाजनने डिम्पी गांगुलीशी लग्न केले होते आणि दोघेही ५ वर्षे एकत्र राहत होते आणि त्यानंतर 2015 मध्ये दोघे वेगळे झाले होते.