'सिंघम ३'मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री, ज्युनियर श्रॉफ झळकणार एसीपीच्या भूमिकेत

 रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. सिंघम फ्रँचायझीचा हा तिसरा चित्रपट आहे ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Updated: Oct 20, 2023, 02:14 PM IST
'सिंघम ३'मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री, ज्युनियर श्रॉफ झळकणार एसीपीच्या भूमिकेत title=

Tiger Shroff In Singham Again : रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. सिंघम फ्रँचायझीचा हा तिसरा चित्रपट आहे ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टीच्या कॉप यूनिवर्समध्ये आता नवीन अधिकारी सामील होत आहेत. नुकताच दीपिका पदुकोणच्या लूकवरून पडदा हटवण्यात आला. लेडी सिंघमला पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत.

नुकतच अक्षय कुमारने नवीन एसीपीची चाहत्यांना ओळख करून दिली आहे. आणि हा नवा एसीपी दुसरा तिसरा कोणी नसून हा नवीन एसपी टायगर श्रॉफ आहे. आता सिंघम अगेनमध्ये टायगर श्रॉफने एन्ट्री घेतली आहे.   तो एसीपी सत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमारने पोस्ट शेअर करून ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

अक्षयकुमारने ओळख करून दिली
अक्षय कुमारने टायगरच्या लूकचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो त्याची टोन्ड बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे. त्याच्या एका हातात बंदूक आहे. फोटो शेअर करत अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''दूसरी माँ से अपने भाई का स्वागत करता हूं. टाइगर श्रॉफ बतौर एसीपी सत्या.''

चाहते झाले एक्साइटेड
टायगर श्रॉफला कॉप युनिव्हर्सचा एक भाग बनताना पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. अक्षयच्या पोस्टवर त्याचे चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं आहे की,  ब्लॉकबस्टर लोडिंग. तर दुसऱ्याने लिहिलं, सुपर. तर अजून एकाने लिहिलं,  सिंघम पुन्हा... भारी कास्टिंग आहे. 500 कोटी सिंघम अगेन.

दीपिकाचा डॅशिंग लूक दिसत आहे
अलीकडेच सिंघम अगेनमधील दीपिका पदुकोणचा लूक समोर आला आहे. दीपिकाचा लूक शेअर करत अक्षयने लिहिलं होतं- 'अपनी लेडी सिंघम को इंट्रोड्यूस करते हैं मिलिए शक्ति शेट्टी से'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वर्कफ्रंटबद्दल बोलायच झालं तर टायगर श्रॉफचा गणपत हा चित्रपट 20 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगरसोबत कृती सेनन आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात टायगर आणि क्रिती दोघंही जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहेत.