'सिंघम अगेन' चित्रपटाने दोन दिवसांमध्ये मोडले दोन चित्रपटांचे रेकॉर्ड, केली इतकी कमाई

अजय देवगनचा 'सिंघम अगेन' चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने दोन दिवसांमध्येच दोन चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 3, 2024, 06:37 PM IST
'सिंघम अगेन' चित्रपटाने दोन दिवसांमध्ये मोडले दोन चित्रपटांचे रेकॉर्ड, केली इतकी कमाई

Singham Again Box Office Collection Day 3: बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अनेक मोठे कलाकार आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी प्रचंड कमाई केली आहे. या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये दोन चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

त्यासोबतच 'भूल भुलैया 3' हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने देखील 3 दिवसांमध्ये 100 कोटींचा आकडा गाठला आहे. दोन दिवसांच्या कमाईनंतर हा चित्रपट 125 कोटींची कमाई करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

'सिंघम अगेन' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाई

सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाने पहिल्या दिवशी 43.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 41.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 3.15 वाजेपर्यंत 14.24 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 100.24 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यासोबतच या चित्रपटाने तीन दिवसांमध्येच दोन चित्रपटांना मागे टाकले आहे. 

शैतान चित्रपट

यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'शैतान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 147.97 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 79.75 कोटींची कमाई केली होती. अशातच अजय देवगनच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाने दोन दिवसांमध्येच या चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. चित्रपटाची दोन दिवसांची कमाई पाहता हा चित्रपट 'शैतान' चित्रपटाच्या एकूण कमाई पेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे. 

दृश्यम 2 चित्रपट

'दृश्यम 2' चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात 104.66 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचा रेकॉर्ड 'सिंघम अगेन' हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात मोडणार अशी शक्यता आहे. याआधी 'सिंघम रिटर्न्स' या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 112.68 कोटींची कमाई केली होती. आता 'सिंघम अगेन' हा चित्रपट पहिल्या आठवड्यात किती कमाई करतो हे पाहावे लागेल. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More