स्मृती इराणींचा हरवला झुमका, ट्विंंकल खन्नांंनी दिला हा सल्ला

गुरूवारी दिल्लीमध्ये 65 वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. 

Updated: May 4, 2018, 03:24 PM IST
स्मृती इराणींचा हरवला झुमका, ट्विंंकल खन्नांंनी दिला हा सल्ला  title=

मुंबई : गुरूवारी दिल्लीमध्ये 65 वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळेस राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोबत प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी पुरस्कार विजेत्या कलाकारांचा सन्मान केला. या सोहळ्यादरम्यान स्मृती इराणींच्या केवळ एकाच कानामध्ये झुमका दिसत होता. त्यामुळे अभिनेत्री ट्विंकल खन्नाने त्यांच्या हरवलेल्या झुमक्यावर खास ट्विट आणि सल्ला दिला आहे. 

स्मृती इराणींना खास सल्ला 

गुरूवारी एका पत्रकाराने स्मृती इराणींना टॅग करून तुमच्या एकाच कानात झुमका असल्याची गोष्ट निदर्शनास आणूस दिली. मी इतक्या लहान लहान गोष्टींकडे लक्ष देते असे तुम्हांला वाटत असेल पण माझ्या या गोष्टीचा चूकीचा अर्थ काढू नका. 

ट्विंकल खन्नाने सुचवला उपाय 

स्मृती इराणींनी रिट्विट करून मला हरवलेलं कानातलं मिळालं नाही असे ट्विट केले. सोबतच दु:खी इमोजीदेखील शेअर केला. यावर ट्विंकल खन्नाने ट्विट करताना म्हटले, 'जीवन मामा' असं तीन वेळेस म्हटल्यास हरवलेली गोष्ट सापडते  असं म्हणतात. तुम्ही देखील हा उपाय ट्राय करू शकता. 

काही वेळात स्मृती इराणींनीदेखील कानातलं मिळाल्याचं म्हणत ट्विट केलं आहे.