मुंबई : सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात अखेर शिक्षा सुनावली. जोधपुर न्यायालयाने अभिनेता सलमान खानला 5 वर्षाची शिक्षा झाली असून 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या शिक्षेनंतर आता सलमान खानची रवानगी जोधपुरच्या मध्यवर्ती कारागृहात होणार आहे. सलमान खानला न्यायालयात ही शिक्षा सुनावल्यानंतर सलमानच्या बहिणी ओक्साबोक्शी रडायला लागल्या. एवढंच काय तर सलमान खानच्या डोळ्यात देखील पाणी आलं. न्यायालयाच्या या निर्णयानंतर सोशल मीडियालवर एक प्रश्न उपस्थित झाला.
सलमान खानवर काळवीट शिकार प्रकरणाबरोबरच आणखी तीन आरोप आहेत. हिट अॅण्ड रन प्रकरणाचा खटला देखील सलमान खानवर होते. हिट अॅण्ड रन प्रकरणात सलमानवरील दोष सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं मत हायकोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळेच सलमानला दोषी ठरवलं जाऊ शकत नाही, असं हायकोर्टाने म्हटलं. 28 सप्टेंबर 2002 रोजी सलमानच्या लँड क्रूझर गाडीनं ब्रांद्र्यात फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना चिरडल्याचा आरोप होता. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले होते. मात्र या प्रकरणातून सलमान खानची निर्दोष सुटका झाली.
त्याचप्रमाणे सलमान खान काळीवट शिकार प्रकरणात दोषी सापडला असून त्याला 5 वर्षाची शिक्षा झाली आहे. याचा अर्थ असा की, माणसाच्या मृत्यूची काहीच किंमत नाही का? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. यावेळी शिक्षा ऐकून सलमान खान रडला. पाच वर्षांची शिक्षा झाल्याने त्याला आता अटक होण्याची शक्यता आहे. त्याची थेट जोधपूर जेलमध्ये रवानगी होणार आहे.
सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर सलमानची बहीण अलबिराला रडू आल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानच्या बहिणी त्यांच्या विषयी अधिक भावनिक आहेत. आज सलमानबरोबर बहिणी दिसल्या, पण भाऊ दिसत नव्हते, पण एकूणच सलमान खानला मोठा दिलासा आहे.