अभिनेत्रीसोबत असं नेमक काय घडलं ज्यामुळे 'ती' रेस्टॉरंटमधून बाहेर येताच चिडली

अभिनेत्री शमिता शेट्टी आजकाल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Updated: Mar 21, 2022, 09:18 PM IST
अभिनेत्रीसोबत असं नेमक काय घडलं ज्यामुळे 'ती' रेस्टॉरंटमधून बाहेर येताच चिडली title=

मुंबई : अभिनेत्री शमिता शेट्टी आजकाल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आता प्रत्येकजण तिच्या आणि राकेश बापटच्या लग्नाची वाट पाहत आहे.या दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. नुकताच पुन्हा एकदा राकेश आणि शमिताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये शमिता खूप नाराज दिसत आहे.
 
राकेश बापटसोबत पार्टी
खरंतर, नुकतीच शमिता शेट्टी तिचा बॉयफ्रेंड राकेश बापटसोबत रात्री उशिरा पार्टीला गेली होती. पार्टीनंतर शमिता तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर आली तेव्हा सगळे पापाराझी तिचे फोटो क्लिक करण्यासाठी उभे राहिले. अशा परिस्थितीत शमिता सुरुवातीला थोडी नाराज दिसली पण तिने पापाराझींना पोज देण्यासाठी स्माईलही दिली.

शमिता शेट्टी रागात
कॅमेरापर्सनला पोज दिल्यानंतर शमिता खूप चिडलेली दिसत होती. आणि फोनवर बिझी झाली. यादरम्यान राकेश बापटही चकित दिसत होता. खरंतर, शमिता शेट्टीला तिची कार मिळत नव्हती. त्यामुळे तिची थोडी चिडचिड दिसत होत होती. आणि यामुळेच ती आरडाओरडा करु लागली मात्र, गाडी मिळताच ती घाईघाईने गाडीत बसली आणि राकेश बापटसोबत निघून गेली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राकेश आणि शमिताची सुपरहिट जोडी
शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांनी 'बिग बॉस ओटीटी'वर अनेकांची मने जिंकली. राकेश आणि शमिता यांची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. अलीकडेच त्यांच्या ब्रेकअपची अफवा पसरली होती आणि दोघांनी ही बातमी खोटी असल्याचंही म्हटलं होतं.