close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कॅंन्सरवर सोनालीची मात, लवकरच परतणार रुपेरी पडद्यावर

 २०१८ साली सोनालीला कॅंसर झाल्याची बातमी कळताच तिचे चाहते आणि कलाविश्वात लोकांना मोठा धक्का बसला होता. 

Updated: Feb 3, 2019, 01:20 PM IST
कॅंन्सरवर सोनालीची मात, लवकरच परतणार रुपेरी पडद्यावर

मुंबई: अभिनेत्री सोनाली बेंद्रेने कॅंन्सरसारख्या गंभीर आजारावर मात मिळवली आहे. २०१८ साली सोनालीला कॅंसर झाल्याची बातमी कळताच तिचे चाहते आणि कलाविश्वात लोकांना मोठा धक्का बसला होता. आपल्या या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी सोनाली काही महिने अमेरीकेत होती. आता तिच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. सानोली पूर्णपणे बरी झाली असून ती लवकरच रुपेरी पडद्यावर एन्ट्री करणार आहे. सोनालीची सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वसाच्या जोरावर तिने तिच्या आजारावर मात करत मृत्यूच्या भयंकर जाळ्यातून बाहेर आली आहे. सोनालीने स्वत:च्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटा शेअर केला आहे. 

इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शन दिले. 'खूप आराम केल्यानंतर पुन्हा माझ्या कामाकडे वळत आहे, माझ्यासाठी हा खूप सुखद अनुभव आहे, माला माझ्यावर गर्व वाटत आहे. माझ्याकडे माझा आनंद व्यक्त कराण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत'.आजारा दरम्यान सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या होत असलेल्या उपचाऱ्याच्या बातम्या चाहत्यांना देत होती. सोनाली आता सुखरुप भारतात परतली आहे.

 

कॅमेऱ्याला फेस करणं आणि ते पात्र साकारणं त्या पात्रातील भावनांना जिवंत करणं, गेल्या काही महिन्यांपासून माझ्या भावना तीव्र होत चालल्या आहेत, अशा भावना कॅमेऱ्या समोर जिवंत करणं हे माझ्या कामासाठी फार गरजेचे आहे. #SwitchOnTheSunshine #OneDayAtATime. अशा ऊर्जा निर्माण करणाऱ्या भावना सोनालीने व्यक्त सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.