मुंबई : देशात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवाल आहे. या कोरोना काळात देशातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठे बदल होत असल्याचं दिसून येत आहे. देशात आजही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता सर्वत्र ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य दिलं जात आहे. परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीदरम्यान विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात गरजूंच्या मदतीला धावून आलेल्या सोनू सूदने आता ऑनलाईन शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून सर्व शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षण घेताना मोबाईन नसणं, नेटवर्क नसणं अशा कित्येक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. पण विद्यार्थांची ही अडचण देखील सोनूने दूर केली आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये अडथळा नको म्हणून त्याने गावामध्ये टॉवर उभारला आहे. पंचकुलापासून जवळपास १५ किलोमीटर दूर असलेल्या दापना गावात खराब नेटवर्कमुळे विद्यार्थ्यांना कित्येक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत होता. मात्र अता सोनू सूदच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या दूर झाल्या आहेत.
सोनू सूदच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आणि गावामध्ये आनंदाचे वातावरण असून सोनूचं भरभरून कौतुक होत आहे. शिवाय याआधी देखील सोनूने लॉकडाऊन काळात अनेक कामगारांची मदत केली. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू श्रमिकांसाठी मात्र हिरो ठरला आहे.